23/03/2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 23/03/2017 वार - गुरुवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.
💥 जन्म ;-
⌛१९१० : डॉ. राम मनोहर लोहिया.
⌛१९२६ : रविंद्र पिंगे.
💥 मृत्यू :-
⌛१९३१ सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहात गोंधळ घालणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांना ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले निलंबित
2⃣ सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश आणि ओडिशाचं नाव दुष्काळग्रस्त राज्यांच्या यादीतून वगळलं
3⃣ बिहार, झारखंड, तेलंगणा, कर्नाटका, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्र दुष्काळग्रस्त राज्ये म्हणून घोषित
4⃣ चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर, तिन्ही महापालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान, 21 तारखेला मतमोजणी
5⃣ परीक्षांमुळे दिल्लीतील पालिका निवडणुकीची तारीख पुढे ढकलली. आता 23 एप्रिलला मतदान आणि 26 एप्रिलला मतमोजणी होईल
6⃣ निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची मंत्री गिरीश महाजन यांची माहिती, रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 1100 सुरक्षास रक्षक तैनात करणार
7⃣  बीसीसीआयने जाहीर केली खेळाडूंची वार्षिक मध्यवर्ती कराराची यादी; विराट कोहली, धोनी, अश्विन, रहाणे, पुजारा, जडेजा, मुरली विजय यांची ग्रेड ए यादीत निवड.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्थानिक बातमी :-*
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव केंद्र झाले 100 टक्के डिजिटल, काल केंद्रातील उर्वरित कावलगुडा खु., काराळा आणि कावलगुडा बु. या तीन गावात झाले डिजिटल शाळेचे उदघाटन
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधी तरी, कुठे तरी केव्हातरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच " आयुष्याचा टर्निंग पाँईंट " म्हणतात......✍*

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *केंव्हातरी*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 आचार्य सूर्यकांत, निवृत्त हिंदी शिक्षक
    हु. पा. हायस्कूल धर्माबाद
👤 अशोक गड्डमवार
👤 संजय मनुरे, हिंदी कवी, धर्माबाद
👤 साईनाथ सुत्रावे
👤 साईनाथ मुलकोड, येवती ग्रामपंचायत सदस्य,
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

    *" तमाशे "*

आपला माणूस पहा
वेगळा वागला आहे
म्हणून पराभव हा
जिव्हारी लागला आहे

आपले म्हणणारे ही
वेगळे वागायला लागले
सगळे लोक गटबाजीचे
तमाशे बघायला लागले

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* विषयी

https://docs.google.com/forms/d/1xKdYFyKk9PCnnE-coLFYwo-e6jD3wlhjdjWgVS4nPW0/edit?usp=drivesdk&chromeless=1

आपले अभिप्राय गुगल फॉर्म द्वारे कळवावे
----------------------------------------------------
*आजचा*
•••●☆‼ *विचार धन* ‼☆●•••

*एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.*

*कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.*

    ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••
            🌼🌼🌼🌼🌼🌼
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध...........✍*
〰〰〰〰〰〰〰〰
आपण स्वतः केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे.त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.आपण करत असलेल्या
कृतीसाठी लागणारे साहित्य कौशल्य,
एकाग्रता,पूर्वानुभव,
समयसूचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात.हे आपल्याला दुस-याच्या करण-या कृतीतून मिळत नाही.
आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे मनाला समाधान मिळते   ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही.यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हे देखील शिकायला मिळते.

-व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
          8087917063.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
----------------------------------------------------
*वपुर्झा*

प्रश्नांपासून नेहमी पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच. पळवाटा मूक्कामाला पोहचवत नाहीत. मूक्कामाला  पोहचवतात ते सरळ रस्तेच.
~ वपु काळे | वपुर्झा

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*

   लोभाची शिक्षा

एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस
*तात्‍पर्य –* लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे.   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍ साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments