24 मार्च 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 24/03/2017 वार - शुक्रवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*
      *जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन.*

⌛१८५५ : आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
⌛१९७७ : मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला व कॉंग्रेसची तीस वर्षाची सत्ता संपुष्टात झाली.
💥 जन्म :- 
⌛१९२४ : ज्ञानपीठ विजेते बिरेंद्रकुमार भट्टाचार्य.
💥 मृत्यू :- 
⌛१६०३ : एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी ५0 टक्क्यांची र्मयादा ठरवून दिलेली असल्याने आरक्षण वाढविण्याची कसलीही शक्यता नसल्याचे सरकारने काल केले स्पष्ट
2⃣ पाकिस्तानच्या राष्ट्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांना दिल्या शुभेच्छा
3⃣ रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 600 कोटींचा निधी विकास आराखड्याला केंद्राची मान्यता - मंत्री विनोद तावडे
4⃣ राज्यात स्वाईन फ्लूचे २२२ रुग्ण आढळले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक १७ आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत आरोग्य सचिवांनी स्वाईन फ्लूबाबत पुण्याला दिला ‘हाय अलर्ट’
5⃣ महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणीहिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी कल लोकसभेत आली. 
6⃣ पुणे संघाने 2017च्या पर्वासाठी द.आफ्रिकेच्या इम्रान ताहिरला केले करारबद्ध
7⃣ विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत, विराटच्या चौथ्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथी कसोटी शनिवारपासून

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

"दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *दुबळी*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 संतोष गुंडेटवार, राज्य सचिव

महाराष्ट्र राज्य पद्माशाली कर्मचारी संघटना

👤 राम मठवाले, सहशिक्षक, धर्माबाद
👤 सोमनाथ वाळके, तंत्रस्नेही शिक्षक
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

      "गट "
यांच्यात काय त्यांच्यात काय
सगळ्यां मध्ये गट असतात
इथे कोणी व्हिलन तर
कोणी कोणी नट असतात

नट असला तरी त्याला
व्हिलन ठरवले जाते
नट म्हणून व्हिलनला
कौतुकाने फिरवले जाते

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
  ----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

आत्ता फ्रेश मॉर्निंग बुलेटिन apps च्या स्वरुपात

http://app.appsgeyser.com/4695364/FreshBuletin

वरील लिंकला क्लिक करून download करावे.
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🔸 *॥ विचार धन ॥* 🔸●•••

*अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.*

*खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!*
           
  ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼ ★●••
            🔰🔰🔰🔰🔰🔰
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
      9167937040
----------------------------------------------------
*आज*

----------------------------------------------------
*वपुर्झा*

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
   
*❃ म्हातारा आणि त्याचा घोडा*
        
        *एक म्हातारा व त्याचा मुलगा* आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणूस त्या म्हातार्‍याला म्हणाला, 'हा लहान मुलगा पायी चालला आहे, त्यापेक्षा तू त्याला घोड्यावर बसव.'
       ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम धरून चालू लागला. पुढे दुसरा माणूस त्या मुलाला म्हणाला, 'आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला घोड्यावर बसून जायची लाज वाटत नाही का?'
       ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला. थोडे पुढे जाताच दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, 'म्हातारा पहा, लहान मूल पायी चाललं असता आपण घोड्यावर बसून कसा चालला आहे?'
           ते ऐकताच त्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसवून घेतले. ते आणखी थोडे पुढे जाताच तोच एक माणूस त्यांना विचारतो, 'हा घोडा तुमचाच का?' म्हातारा म्हणाला, 'हो.' माणूस म्हणाला, 'मला काही खरं वाटत नाही, कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही?'
           ते ऐकताच दोघेही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोड्याला आडवे करून त्यांनी त्याचे पाय बांधले. मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले.
            ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळया पिटून मोठमोठ्याने हसू लागले. तो आवाज ऐकून घोडा बिचकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले. दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व बुडून मरण पावला.

       *तात्पर्य*
    *प्रत्येकजन वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणे व प्रत्येकाला खूष करणे हे काम फार कठीण आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments