25 मार्च 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 25/03/2017 वार - शनिवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१८९८ : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
⌛अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.
💥 जन्म :-
⌛१८९६ : सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे.
⌛१९३३ : अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर.
⌛१९३२ : व.पु. काळे, मराठी साहित्यिक.
💥 मृत्यू :-
⌛१९९३ : सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ गोवा हे देशातील पहिले भिकारीमुक्त राज्य बनविणार  मुख्यमंत्री पर्रीकर यांची अर्थसंकल्पातून घोषणा.
2⃣ मार्डने संप मागे घेतल्याचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र, आज सकाळी आठ वाजल्यापासून कामावर होणार रुजू
3⃣  भाजपाचे दोन मंत्री गुढीपाडव्याला 'मातोश्री'वर जाणार, युतीमधील तणाव निवळण्यासाठी शिवसेनेसोबत करणार चर्चा
4⃣ कोणत्याही प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीच्या निवडणूक लढण्यावर आजन्म बंदी का घालण्यात येऊ नये अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. याप्रकरणी 18 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. 
5⃣  मुंबईत डॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी 181 रुग्णांचा मृत्यू, बीएमसीच्या वकीलांची हायकोर्टात माहिती.
6⃣ फेमा कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचलनालयाने नाईट रायर्डर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट,, लिमिटेस, गौरी खान, शाहरुख खान आणि जुही चावलाला पाठवली नोटीस.
7⃣ ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी मोहम्मद शामी आणि श्रेयस अय्यरचा संघात समावेश. आज पासून होणार सुरु

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

" रहस्ये आश्चर्यांना जन्माला घालतात आणि हे रहस्ये समजून घेणे हेच माणसाच्या समजावून घेण्याच्या इच्छेचे मूळ आहे."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *आश्चर्य*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 चिं.यश जितेंद्र आमटे
👤 राजेश बाहे, अमरावती
👤 पिराजी चव्हाण, कृतिशील शेतकरी
    रा. पाटोदा खु. ता. धर्माबाद
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

       *" दोष "*

आपले ऐकले नाही की
लोक आडमुठे वाटतात
आपल्याला काम करायचे
की त्याला फाटे फुटतात

आपल्यात असलेला चालते
लोकात दोष नको असतो
सगळेच चांगले रहा शेवटी
माणूस हा माणूस असतो

      शरद ठाकर
  सेलू जि परभणी
  8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

भटक्या विमुक्त जाती जमातीतील *ऑनलाइन वधु-वर परिचय मेळावा भाग दुसरा* उद्या रविवारी होणार आहे. ग्रुप मध्ये join होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावे.

संपर्क :- श्री नागेश काळे, चाकूर

संयोजक :- सर्वमान्य वधू-वर ग्रुप 

7385875526 / 7249155587

----------------------------------------------------
*आजचा*
•••●🔻 *॥ विचार धन ॥* 🔻●•••

*'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.*

*रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.*

*महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.*

*"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."*

    ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●••
              ⚜⚜⚜⚜⚜
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
         9167937040
----------------------------------------------------
*आज*

----------------------------------------------------
*वपुर्झा*

स्वतः च्या अज्ञानाची जाणीव असणे, हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.
इति वपु

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
   
    *एक डोळा असलेले हरीण*
     
   एका  हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,'   या विश्वासाने चरत असे ,  पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी ,  होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला.
   मरतांना हरीण मनात म्हणाले ,  " अरेरे !  ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला."

         *_🌀तात्पर्य_ ::~*
    *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments