26 मार्च 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 26/03/2017 वार - रविवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛ १९१० : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडीअसे नाव रूढ झाले.
💥 जन्म :-
⌛ १९६९ : विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
⌛ २००३ : डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन, अमेरिकन सेनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारा नेता.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ इंदू मिलची जमीन राज्य सरकारला हस्तांतरीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा.
2⃣  लखनौ, गाझियाबाद किंवा नोएडामध्ये एका जागेवर कैलास मानसरोवर भवन बांधणार - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन
3⃣  नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चेअरमनपदी नियुक्ती.
4⃣  विरोधी पक्षातील 19 आमदारांपैकी काही आमदारांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता अधिकृत सुत्रांची माहिती.
5⃣  मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला होणार सादर.
6⃣ फिफा 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता नवी मुंबई येथील डी. वाय.पाटील स्टेडियमवर करण्यात आली आहे, पाटील स्टेडियम हे देशातील दर्जेदार स्टेडियम असल्याचा शेरा शनिवारी फिफा पाहणी पथकाने दिला.
7⃣ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर आटोपला

*विशेष बातमी :-*
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 1 एप्रिलपर्यंत रजा न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे दिले निर्देश

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

" सर्व काही संपून गेल्यावर आपल्याजवळ जे काही उरते त्यालाच अनूभव म्हणतात."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *अनुभव*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 श्रेयस संतोष पेंडकर, धर्माबाद
👤 महेश मुटकुले
👤 श्रीकांत सरकलवाड
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

     *" चेहरा "*

ख-या चेह-यामागे
वेगळा चेहरा आहे
प्रत्येक चेह-याची
न्यारी त-हा आहे

दिसतो तेवढा स्पष्ट
चेहरा कधीच नसतो
त्यामागे बेगडीपणा
नक्की जास्त असतो

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

तुम्ही आम्ही पालक एप्रिल 2017 चा अंक
*सोशल मीडिया आणि पालकत्व*
प्रसिद्ध झाला

संपत्तीसहयोगातून समाजाला समर्पित, विनाजाहिरातीचे, बहुरंगी आणि जागरूक पालकत्वाला वाहिलेले अतिशय दर्जेदार असे *तुम्ही आम्ही पालक* मासिक

*मासिकाची वार्षिक वर्गणी ₹700*

आपण अजून मासिकाचे सभासद झाला नसाल तर आपण ऑनलाईन (online) पद्धतीने
*www.sirfoundation.org.in* वर नोंदणी करू शकता किंवा आपली वर्गणी रोख/ चेक/ डीडी ने थेट
*SIR FOUNDATION*,
Bank of Maharashtra Narayanpeth शाखा ,
*A/c no. 60135365348*
IFSC MAHB0000154
या खात्यावर भरू शकता.

*पत्रव्यवहाराचा पत्ता*

*तुम्ही आम्ही पालक* मासिक
*सर फाऊंडेशन*
२०१, बाळकृष्ण अपार्टमेंट,
गजानन चैतन्य बिल्डिंगच्या आत, पत्र्या मारुती मंदिराजवळ,
नारायण पेठ, पुणे 411030

आपणांस अधिक माहिती हवी असल्यास
*(24 ×7)हेल्पलाईन*
*73040 55000*

*ऑफिस* (सकाळी 10.30 ते सायं 6.30) *8605009232*
020-24465885/24457781
या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
info@sirfoundation.org.in

आपण सभासद व्हा आणि इतरांनाही ही माहिती पाठवून प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे सामाजिक कार्यात आपला वाटा उचलू शकता.

अंकात लेख लिहायचे असल्यास, काही सूचना किंवा भरीव योगदान द्यायचे असल्यास आपण
थेट संपर्क साधू शकता.

*हरीश बुटले*
संपादक मो. 9422001560
hariahbutle@gmail.com
----------------------------------------------------
*आजचा*
•••●⭐‼ *विचार धन* ‼⭐●•••

*नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.*

*सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.*

     •••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•••
           🌷🌷🌷🌷🌷🌷
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध..........✍*०
〰〰〰〰〰〰〰〰
परमेश्वराने आपल्याला सुंदर असे जीवन दिले.
जीवनात जीवनभर आनंद लुटण्यासाठी सुंदर असे डोळे दिले.या सुंदर डोळ्यांनी सा-या जगाचे सौंदर्य पाहण्याचे आणि त्याचा आस्वाद घेण्याचे काम आपले आहे. जगाचे जर थोडे सुक्ष्म निरीक्षण करुन पाहिले तर सर्वत्र आनंद ही आनंदच  पाहायला मिळतो.तशी आपली वृती असायला हवी.सुख,शांती,समाधान,  नवे चैतन्य,नवी आशा या सा-या गोष्टी आपल्याला या जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहून मिळते.
आकाशाकडून मनाचा उदारपणा,धरतीकडून
संयम आणि सहनशिलता,
पक्ष्यांकडून आनंदाने संचार करणे,नदीच्या प्रवाहातून सदैव चालत राहणे,वा-याकडून जीवनात गतीने पुढे पुढे जाणे, ऊंच पर्वताकडून जगाकडे पाहून अंतःकरण मोठे करणे,वृक्षवेलीकडून इतरांना सहारा देणे असे कितीतरी गुण आपल्याला आत्मसात करुन घेता  येतात.हे आपल्या नजरेने निरिक्षण केल्यानंतर आपल्याला कळेल.मग आपल्याच डोळ्यांनी आपल्याला या जगात सुंदर जीवन जगण्याची प्रेरणा देते.यापेक्षा अजून सुंदर जीवन कुणाचे असेल? अशा सुंदर जीवन जगण्याला आपण खरे तर आनंदाने स्वीकारायलाच पाहिजे आणि आनंद लुटला पाहिजे.पुन्हा असे सुंदर जीवन या जगी येणार नाही.या जन्मासाठी आणि या जगण्यासाठी आपण परमेश्वराचे आभारच मानायला हवे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590/
  8087917063.

🌈🌅🏜🌈🌅🏜🌈🌅🌈🌅🏜🌈🌅
----------------------------------------------------
*वपुर्झा*

"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
     
     *❃ फसवे बाह्यरूप ❃*
     
   एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.
     आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला.
    त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'

         *_🌀तात्पर्य_ ::~*
  *बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments