28 मार्च 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 28/03/2017 वार - मंगळवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

       *गुढीपाडवा - मराठी नववर्ष*

⌛ मुंबईतील सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले
⌛ १९९२ : भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
⌛ १९९८ : सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणकदेशाला अर्पण केले
💥 मृत्यू :-
⌛ १९८४ : स्वातंत्र्यसंग्रामातील थोर पुढारी भाऊसाहेब रानडे.
⌛ १९९२ : आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ योजनांचे फायदे पोहोचवण्यासाठी सरकार आधारकार्ड बंधनकारक करु शकत नाही - सर्वोच्च न्यायालय
2⃣ लोकसभेत 29 मार्चपासून जीएसटीवर चर्चा सुरु होणार.
3⃣  गुजरात निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ही नाव
4⃣ मानसिक आरोग्य विधेयक 2016 लोकसभेत मंजूर
5⃣ सोलापूरच्या एनटीपीसी प्रकल्पातून पहिल्या टप्यातील वीजनिर्मितीला 31 मार्चपासून पूर्ण क्षमतेने प्रारंभ होणार नरेंद्र राय यांची माहिती.
6⃣ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवडयांच्या आत योजना सादर करण्यास सांगितले आहे.
7⃣ धरमशाला येथील चौथ्या आणि निर्णायक कसोटीवर भारताची पकड, तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात भारत बिनबाद 19 धावा. विजयासाठी 87 धावांची आवश्कता. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 137 धावात संपला. भारताने पहिल्या डावात घेतली होती 32 धावाची आघाडी .
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्थानिक बातमी -*
शाळा सुटल्यानंतर एरंडीच्या बिया खाल्ल्याने 20 शाळकरी मुलांच्या तब्येतीत बिघाड, मुलांना उपचारासाठी मुखेड तालुका रुग्णालयात केले दाखल, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पेठवडज येथील घटना, मुलांची प्रकृती धोक्याबाहेर
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

" जीवनाचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दुःख भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *मार्ग*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 स्वानंद बेदरकर, नाशिक
👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा साहित्यिक, वसमत
👤हर्ष प्रदिपकुमार मुक्कावार, उदगीर
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

        *" शुभेच्छा "*

हर्षाचा नववर्षाचा
आज गुढीपाडवा आहे
प्रेमाच्या नात्यांचा
आपल्यात गोडवा आहे

प्रेमाच्या या नात्यात
कायम गोडवा रावो
नवीन मराठी वर्ष हे
आपणास आनंदाचे जावो

*गुढीपाडव्याच्या आपणांस व आपल्या कुटुंबास हार्दीक शुभेच्छा*
   
     शरद ठाकर
  सेलू जि परभणी
  8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

----------------------------------------------------
*आजचा*

•••●🚩‼ विचार धन ‼🚩●•••

*खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ?  बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!*

*कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?*

*" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "*
     
  •••●💥‼ *रामकृष्णहरी*  ‼💥●•••
               🚩🚩🚩🚩🚩🚩
       *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
          9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯  विचारवेध........✍
++++++++++++++++++++
      जर तुम्हाला कधी कुणाला द्यायचेच असेल तर तुमच्या चेह-यावरचे थोडे हास्य द्या कारण तुमच्या थोड्या स्मितहास्याने इतरांच्या जीवनात असलेल्या दुःखाचा विसर काही काळ दूर होऊ शकेल.
जर तुम्हाला कधी कुणाला द्यायचेच असेल तर तुमच्याकडे असणारे थोडे सहकार्य द्या की ज्या सहकार्यातून इतरांना जीवनात चांगले जीवन जगण्याचे बळ मिळेल.जर तुम्हाला द्यायचेच असेल
तर थोडे प्रेमही द्यायला विसरु नका. कारण तुमच्या अंतःकरणातील प्रेमामुळे इतरांच्या
जीवनात चैतन्याने
जगण्याची पालवी बहरेल.
हाच तर तुमच्या आमच्या जगण्यातला माणुसकीचा खरा अर्थ आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590/
          8087917063.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
----------------------------------------------------
*वपुर्झा*

काळ हा माणसाचा शत्रू नव्हे . तो सर्वात जवळचा मित्र आहे.मुख्य म्हणजे तो गतिमान असल्याने नित्य टवटवीत , ताजा असतो.एखाद्या दिवसाची तो तुम्हाला वाट पाहायला लावतो ते तुमचा अंत पाहायला म्हणून नव्हे, तर त्या दिवसाला तुम्ही कडकडून , तीव्रतेने भिडावं म्हणून !
जेवढी प्रतीक्षा मोठी , तेवढाच पूर्तीचा क्षण ज्वलंत , ताजा , उत्कट !

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
  
           *❃ सचोटी ❃*
  
     *एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’

    *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन :- साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments