29 मार्च 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 29/03/2017 वार - बुधवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१८५७ : क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.
💥 जन्म :- 
⌛१९२९ : उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता
💥 मृत्यू :- 
⌛१९६४ : शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ मुकेश अंबांनी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना १२0 जीबी ४जी डाटा मोफत देण्याची तयारी चालविली आहे. १ एप्रिलपासून कंपनीची पेड सेवा सुरू होईल.
2⃣ धुळे शहरचे तापमान गुढी पाडव्याला ४३.४ अंश सेल्सिअसवर पोहचले
3⃣ सद्यस्थितीत लोकपालांची नियुक्ती अशक्य; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले
4⃣  मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या *उन्नत शेती समृद्ध शेतकरी* अभियानाचा शुभारंभ केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. आकाशवाणीवरून शेतकऱ्यांना संदेश प्रसारीत करून कृषिमंत्र्यांनी अभियानाची सुरूवात केली.
5⃣ दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील ६६0 मेगावॅट वीजनिर्मिती चाचणी यशस्वी झाली आहे. येत्या दोन दिवसात हा प्रकल्प होणार कार्यान्वित
6⃣ भारताने सामन्यासह बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकली, भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 विकेटने विजय. मालिकेत 25 विकेट घेणा-या रविंद्र जाडेजाला समानावीर  आणि मालिकावीराचा पुरस्कार.
7⃣ ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका जिंकणा-या भारतीय संघाला बीसीसीआयने  संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपये तर, प्रशिक्षिक अनिल कुंबळेला 25 लाख रुपय इनाम केले जाहीर

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

परमेश्वर पहिल्यांदा एक क्षण
देतो व दुसरा क्षण देताना पहिला  क्षण काढून घेतो

*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *पहिल्यांदा*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 बाबाराव पडलवार, प्राथमिक शिक्षक
👤 पंकजकुमार पालीवाल, प्राथमिक शिक्षक
👤 प्रदीप मनुरकर, धर्माबाद
👤 उदय पवार, प्राथमिक शिक्षक
के.एम. पाटील विद्यालय, पाटोदा बु.
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

     *" बेडूक "*

गार लागेल तिथेच
बेडकांची उडी असते
गार जागी बसण्यात
बेडकांना गोडी असते

त्रास झाला की बेडूक
डराव डराव करतात
आरडाओरडा करून
गारगार जागा धरतात

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*
नमस्कार मित्रांनो ,

     नासा येवतीकर यांचे apps डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा....

http://app.appsgeyser.com/Na.%20Sa.

यासोबतच पुढिल लिंकला क्लिक करुन ही डाउनलोड करु शकता.....

 http://www.appsgeyser.com/2213717

एकदा करून बघा . . . . .
----------------------------------------------------
*आजचा*
•••●★‼ *विचार धन* ‼★●•••

*संत कबीर म्हणतात..."बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलीया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय."*

*'आदर्श व्यक्तिमत्व' एका दिवसात बनू शकत नाही. या जगात वाईटाचा शोध घेतला तर सर्वात वाईट आपण स्वत:च  सापडतो.*

*'शिल्पकार' जसा एखादे शिल्प घडविताना, त्यातील नकोसा भाग काढतो व हवासा भाग ठेवून एक देखणे शिल्प तयार करतो. तद्वतच आपल्यातील दोष शोधून,ते काढून टाकून एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' बनण्याचा 'संकल्प'  हिच खरी 'घटस्थापना.'*

*हि विधायक 'घटस्थापना' झाली कि आपोआपच ह्रदयात 'मानवतेची प्रतिष्ठापना' झालीच म्हणून समजा.*
         
        ••●‼ *रामकृष्णहरी*  ‼●•••
          🌼🌼🌼🌼🌼🌼
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🌼श्री स्वामी समर्थ 🌼

      ( ‘मी’ चा त्‍याग )

    एकदा विख्‍यात संताना भेटण्‍यासाठी एक राजा आला आणि म्‍हणाला,’’ तुम्‍ही मला त्‍या स्थितीमध्‍ये घेऊन जा, ज्‍या स्थितीमध्‍ये तुम्‍ही आहात.’’ संताने म्‍हटले,’’ महाराज मी तुम्‍हाला त्‍या अवस्‍थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्‍ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्‍हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्‍या दारापाशी येताच संताच्‍या नावाने हाक मारली. त्‍याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्‍हा कुटीपाशी गेला, त्‍याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्‍हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्‍हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्‍हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्‍या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर देत नाहीत , त्‍यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस परत माघारी फिरावे लागले आहे, आता चौथ्‍या दिवशी जाऊन बघु. चौथ्‍या दिवशी पण राजा गेला, त्‍याने संतांच्‍या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्‍यांनी राजाला जवळ घेतले आणि म्‍हणाले, ‘’राजन तुम्‍ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्‍या उत्तरात तुम्‍ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्‍हाला एकट्यानेच बोलावले होते. तुम्‍ही तुमच्‍या मी पणाला बरोबर घेऊन आलात. मानवीजीवनात या मी पणाला काहीही स्‍थान नाही. मी पणा सोडला की खूप काही शिकावयास मिळते’’

तात्‍पर्य- मानवाने ‘’मी’’ पणा सोडल्‍यास खूप काही प्राप्त होते. ‘ मी’ पणाचा मृत्‍यू ज्‍यादिवशी मानवातून होतो तो त्‍यादिवशी संतत्‍वाकडे वाटचाल करू लागतो.

॥श्री गुरुदेव दत्त॥
----------------------------------------------------
*वपुर्झा*

’अंधार्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो.मग काही काळ चालणं अवघड जातं.म्हणून सांगतो.गुरू शोधू नकोस.चालणं,ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं,एकाकी पडणं,दरीत कोसळणं,हे सगळ घडू दे.नियती,प्रारब्ध हे अड्थळे मानू नकोस.ते सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं उरेल.प्रेमपुर्तीत साफ़ल्याची शंका असते,प्रेमभंगातलं वैफ़ल्य नवी पायवाट शोधायला लावते,स्वतःच्या मालकीची’
तु भ्रमात आहासि.....

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
      
              *❃ युक्ती ❃*
    
  सूर्य  आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट
धरू लागला . शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली .

         *_तात्पर्य_*
    नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments