✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 30/03/2017 वार - गुरुवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१६९९ : शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघयांनी खालसा पंथ ची स्थापना केली.
१९२९ : इंग्लड ते भारत अशी विमानमार्गे साप्ताहिक टपालसेवा सुरु करण्यात आली.
💥 जन्म :-
⌛१७४६ : फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार
💥 मृत्यू :-
⌛१६६५ : मुरारबाजी, पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या दिलेरखानाशी झुंज दिलेला
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ लोकसभेत जीएसटीला हिरवा कंदील, जीएसटीचं पाचवं विधेयक राज्यस्तरावर होणार मंजूर
2⃣ आप'कडून जाहिरातीचे ९७ कोटी वसूल करण्याचे उपराज्यपालांचे मुख्य सचिवांना आदेश.
3⃣ छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची केली घोषणा.
4⃣ मुंबई मनपाच्या निवडक 26 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्यात येणार, यासाठी 1 कोटी रुपयांची करण्यात येणार तरतूद
5⃣ राज्यातील 50% शहरं 2 वर्षांत सुंदर दिसतील' 2 ऑक्टो.पर्यंत सर्व शहरं हागणदारीमुक्त होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6⃣ कोकणातील भिरा या ठिकाणी मंगळवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमान ४६.५ अंश सेल्सिअसची झाली नोंद
7⃣ चौथ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर आस्ट्रेलियाच्या 'द डेली टेलिग्राफ'ने विराटवर टीका करताना क्लासलेस, बालिश आणि अंहकारी असल्याची केली टीका
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्थानिक बातमी :-*
साद माणुसकीची सामाजिकता अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर तालुक्यातील कोठारी संकूल आणि त्या अंतर्गत येणाऱ्या दहा शाळेत 20 लाख रुपायतून करण्यात आलेल्या सुविधाचे आज लोकार्पण सोहळा होणार संपन्न
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" मर्यादा या मनाच्या सचेतनामुळे निर्माण होतात. तुम्ही मूलतः अमर्याद आणि परिपूर्ण आहात. नंतर तुम्ही मर्यादांचा स्वीकार करतात आणि मनात परिवर्तीत होतात."
------------------------- रमण महर्षी
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*मर्यादा*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 उत्कर्ष देवणीकर, उदगीर
👤 अनिल पवार
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" सुपातले व जात्यातले "*
सुपातले आनंदाने
हसत असतात
जात्यातले दु:खाने
बसत असतात
सुपातल्यांना जात्यातल्यांचे
दु:ख माहित नसते
कोणाला ही वाटते आपल्यापेक्षा
दुसरे आनंदात असते
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*लोकसहभागातून शाळेची प्रगती*
http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/blog-post_28.html
*एकच ध्येय : डिजिटल शाळा*
----------------------------------------------------
*आजचा*
¤~~~🌹 *॥ विचार धन ॥* 🌹~~~¤
*कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. वयाचा काही काळ त्यांना संस्कार, संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर एका विशिष्ट वयानंतर त्याला 'कर्तव्य' ही संज्ञा प्राप्त होते. मग कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी केले जाणारे काम हेही कर्तव्यात मोडते. 'कामात देव शोधा' हे जीवनाचे खरे तत्वज्ञान मानले पाहिजे. "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो।" हे ज्याला कळले, तोच पुढे जातो.*
*कामाशी साधली जाणारी एकरूपता, त्यातून दिसणारी तादात्म्यता हाही 'उपासना' मार्गच आहे.*
*जो करी कर्म अहेतु निरंतर,*
*देव तयास मिळो न मिळो रे।*
*यातून कवीला जे सांगायच आहे, त्याचे चिंतन करूया. त्यासाठी 'मोहाच्या फुलबागा' दूर सारायला हव्यात. त्यासाठी मनाची अवस्था कोती असून चालणार नाही. आकाशाएवढे मन झाले, तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील. जन्मलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावे लागते. कुणीही त्यातून सुटत नाही. हे टाळून पुढे जाऊया, मनाचा विकास साधूया....*
•••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••
🌷🌷🌷🌷🌷🌷
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आजचा सुंदर विचारवेध*
*🎯विचारवेध...........✍*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
जर नशिबानेच सारे काही होत असेल तर कर्म करायचे कशाला ? जे लोक नशिबावर विसंबून राहतात ते कर्माने दुबळे असतात.जे कर्माने दुबळे असतात ते कधीही आपल्या जीवनात काही करू शकत नाहीत. ते सतत नशिबालाच दोष देत राहतात.जे लोक आपल्या हातावर आणि कर्मावर विश्वास ठेऊन कार्य करतात ते जीवनात सदैव प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असतात.म्हणून नशिबापेक्षा आपल्या करीत असलेल्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवावा म्हणजे आपले जीवन सुखी व समाधानी होऊ शकेल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
----------------------------------------------------
*वपुर्झा*
मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..!
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*❃ किंम्मत ❃*
एका राज महालात एक बाई
मोलकरीण म्हणुन काम करत असते.
तिचा लहान मुलगा ही तिथच तिच्या बरोबर येत असे. एक दिवस त्याला राजमहालात खेळता खेळता हीरा सापडतो , तो मुलगा तो हीरा घेऊन पळत आई कडे जातो. आई बघ मला हीरा सापडला , मोलकरीण हुशार असते , तीला वाटते हा हीरा घेऊन आपण बाहेर नाही जाऊ शकणार ,
ती मुलाला म्हणते नाही रे काच आहे तो हीरा नाही . असे म्हणुन हीरा बाहेर फेकुन देते .
काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हीरा सोबत घेऊन जाते. मग ती तो हीरा सोनारा कडे घेऊन जाते. सोनाराला कळत कि हिला हा हीरा सापडला असणार कुठेतरी. हिला काय माहीत हा हीरा च आहे अस म्हणुन; तो तीला म्हणतो हा हीरा नाही ही तर काच आहे.
असे म्हणुन तो पण तो हीरा बाहेर फेकुन देतो.
जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हीरा घेऊन येतो व जोहरी कडे घेऊन जातो .
जोहरी हीरा पाहतो त्याला कळत हा हीरा अनमोल आहे त्याची नियत खराब होते. तो हीरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो काच आहे अस म्हणतो.
जसा हीरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात.
हे सगळ एक वाटसरु लांबुन पाहत असतो. तो त्या ही-या जवळ येतो आणि त्याला म्हणतो मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकल तेव्हा तु तुटला नाही ,
पण आता का तुटला तु ,
हीरा म्हणतो जेव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले ते माझी खरी किंमत जाणत नव्हते. परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता, तरी त्याने मला फेकले हा आघात मी सहन करुच शकलो नाही. म्हणुन मी तुटलो. असेच मनुष्याच्या बाबतीत होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमच मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.
*_🌀तात्पर्य_ ::~* कधीही आपल्या लोकांचे जराश्या स्वार्था करता मन तोडु नका... आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणस हि-यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment