✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन*🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 03/03/2017 वार - शुक्रवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛००७८- शालीवाहन शक सुरु
⌛१९९१- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले
💥 जन्म :-
⌛१८३९- जमशेदजी टाटा जन्मदिन
⌛१८३९- टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म
⌛१८६०- प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म
⌛१९२८- अख्तर हुसेन यांचा जन्म
💥 मृत्यू :-
⌛ ह.ना.आपटे.
⌛१७०७ : औरंगझेब, मोगल सम्राट.
⌛२००० : रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ ऑनलाइन तिकिटखरेदीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात येणार, आधारकार्ड नसल्यास ऑनलाइन तिकिट खरेदी करता येणार नाही.
2⃣ निवृत्त पोलिसांना अल्पदरात मालकीची घरे देण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच निवृत्त पोलीस आणि कुटुंबातील सदस्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य कल्याण योजनेत मोफत उपचार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तलयाच्या नवीन इमारत आणि ५३२ पोलीस क्वार्टर बांधकामाचे भूमीपूजनावेळी केले प्रतिपादन
3⃣ नाशिक महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक 14 मार्चला, पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती. यंदा अनुसूचित जमातीसाठी महापौरपद राखीव.
4⃣ हिमाचल प्रदेशमधील चंबा भागात बसले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी मोजली गेली
5⃣ अमेरिका आणि भारताचे संबंध लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या सामायिक मूल्यांवर आधारित आहेत, अमेरिकन हाऊस स्पीकर पॉल रायन यांनी एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान केलं वक्तव्य
6⃣ एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँकेसह इतर बँकांची रक्कम काढण्यावर शुल्क आकारणी सुरू, दर महिन्याला ४ व्यवहार फ्री, त्यानंतरच्या व्यवहारांवर १५० रुपयांचे शुल्क आकारणार.
7⃣ भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने सोशल मिडीयावर नवी इनिंग सुरू केली आहे. गुरूवारी सचिनने प्रोफेशनल सोशल मिडीया प्लॅटफॉर्म लिंक्डइन (linkedin.com) वर अकाउंट केलं ओपन
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
ज्याच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद होतो, त्याच्याशी तर बोलाच
पण, ज्याला तुमच्याशी बोलल्याने
आनंद मिळतो, त्याच्याशी जरा अधिक बोला.
*संकलक :- राजेश्वर नारायण येवतीकर*
9049315556
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*तीव्रता*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 सुरेश कटकमवार
👤 अनिल गड्डम
👤 गोविंद चव्हाण
👤 बालासाहेब इंगोले पाटील
👤 इरफान शेख
👤 जयश्री उमरीकर
👤 कैलास माधवराव गंगुलवार
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"काटे की फुले "
म्हणायला सर्वच म्हणतात
सर्व मार्ग खुले आहेत
आम्हाला का माहित नाही
वाटेत काटे की फुले आहेत
वाटेत काटे असो की फुले
वाटेवर चालावे लागते
मनात दु:ख असले तरी
आनंदाने बोलावे लागते
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
🎤
*.....*
*...कवी कट्टा ह्या साहित्यिक समूहानं... अख्या महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षापासून नवनविन उपक्रमातून ...वेड लावलं आहे..*
*अशा समूहाचा..आनंद घेण्यासाठी ...*
〰〰〰〰✍🏻
👇👇👇
https://chat.whatsapp.com/A1yjLeQ9WRU6ZD9WfMM3oZ
----------------------------------------------------
*आजचा*
•••●●★ *॥ विचार धन ॥*★●●•••
*सुगरणीची गोष्ट सर्वांना माहित असेल. सुगरणीचा नक्षीदार खोपा नर बांधतो. सुगरण या खोप्यात आनंदाने राहते. अंडी घालते आणि नंतर दुस-यासोबत उडून जाते. अशी बेवफाई जिव्हारी लागते. खेड्यापाड्यतल्या अनेक म्हातारा-म्हातारींची अवस्था अशीच आहे. ज्यांच्याकडे बघत स्वप्नांचे झुले बांधले ती अंगाखांद्यावर खेळलेली पाखरं पंख फुटल्यावर बेईमान होऊन कायमची उडून गेली खोप्याला मागे सोडून. जख्खड चोचीने भरवलेला दाणा, दुष्काळी झळांमध्ये चोचीत थेंब-थेंब ओतलेलं पाणी, कसं विसरून गेले सारं..!*
*या पाखरांना घरच्यांनीच मुभा दिली होती, दूरदेशी जाऊन चार दाणे चोचीत भरून आणतील या आशेवर भरवंसा होता. पण एकदा उडालेले पंख परतून माघारी फिरले नाहीत. म्हातारपण आजही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे. हे त्यांचं वाट बघणं वेदनादायी आहे. सकाळी रानात सोडलेली गाय सांजेला दावणीला आली नाही तर तिच्या ओढीने व्याकूळ वासरू टिपं गाळत हंबरतं. ते काळीज पिळवटून टाकतं, तसंच यांचं मूकपणे वाट पाहणं, हुंदका गिळून गहिवरणं. आपल्याच माणसांनी झोळीत टाकलेलं लाचारपण घेऊन निराधाराचे रडगा-हाणे कोणाला सांगणार ? आपल्या मोडक्या, गळक्या कुडाची इज्जत गहाण ठेवून थकलेले, भागलेले हताश पाय कशीबशी वाट चालतात. पाखरांची परतीच्या दिवसाची खुळी आशा मनात घेऊन वाट पाहता पाहता पडक्या घराच्या मुंडारीवर उगवलेले गवत वाळुन जाते पण पाखरं ...परततच नाहीत...???* 😢😌
🌱🌿 *॥ रामकृष्णहरी ॥*🌿🌱
🍂🍂🍂🍂🍂🍂
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
=====================
शिशिर ऋतू आला की,
निसर्गाची चांगली असलेली कळा ही अवकळा येऊन रुक्ष वातावरणात रुपांतर होते.चहूकडे नैराश्यच नैराश्य पहायला मिळते.
त्यामुळे सा-या सृष्टीचा नूरच बदलून जातो.पण निसर्गाला माहित आहे की हेही दिवस संपणार आहेत. आनंदाचे नि चैतन्याचे दिवस येणार आहेत.त्यासाठी येणा-या वसंत ऋतूची वाट पहावीच लागणार आहे.आशा आहे म्हणून तर निसर्ग पुन्हा पुन्हा बहरतो.त्याच प्रमाणे जीवनाचेही तसेच आहे.
आज जरी दुःख,वेदना
सहन केल्या तरी उद्याच्या सुखाची अपेक्षा आहे ती पूर्ण होणारच.पण
त्यासाठी आजचे होणारे
दुःख काही काळासाठी भोगावे लागणारच आहे.
वर्तमानाला जर सावरले तर भविष्य उज्वलच होणारे आहे याची तर थोडी प्रतीक्षा करावीच लागेल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलुट करायची ती सुगंधाचीच!
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.
*तात्पर्य* - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment