✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 04/03/2017 वार - शनिवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*औद्योगिक सुरक्षा दिवस*
⌛१८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले
⌛१९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
⌛१९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.
⌛१९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.
💥 जन्म :-
⌛१९२२ : दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
💥 मृत्यू :-
⌛ १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ डाळींच्या साठा र्मयादेत तिपटीने वाढ
2⃣ ज्येष्ठ विचारवंत डॉ. किरवले यांची कोल्हापुरात हत्या
3⃣ तंत्रकुशल युवकांना मिळणार रोजगाराच्या अधिक संधी
4⃣ वक्फ बोर्डाच्या प्रभारी ‘सीईओ’ नसिम बानो निलंबित
5⃣ वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विक्रमी ४ हजार जागा मंजूर
6⃣ बेनामी व्यवहार केल्यास सात वर्षांची सक्तमजुरी
7⃣ अमूल’चे दूध दोन रुपयांनी महागणार
8⃣ राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट
9⃣ खात्यात 5000 रुपये ठेवणे बंधनकारक
0⃣ भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज दुसरा कसोटी सामना, भारतासाठी बरोबरी करण्याची संधी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्थानिक बातमी -
*मांडणीत शिव व्याख्यान चा कार्यक्रम संपन्न.*
कार्यक्रमाचे अध्यक्ष किशनराव पाटील लांडगे ( सरपंच ) तसेच व्याख्याते म्हणून शिवश्री राजेश मनुरकर पाटील आणि शिवश्री श्रीकांत पाटील मुखेडकर हे होते.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन व आभार गजानन पाटील लांडगे यांनी केले
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा केली नाही तर दुःखी होऊ नका .... कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता,*
*जिथे 'तेल आणि वात 'जळते...पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे..*
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*उष्णता*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक
👤 मजहर सौदागर, सहशिक्षक
👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद
👤 अनिल गडाख
👤 ज्ञानेश्वर नाटकर
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" धुंदीत "*
गव्हाचे झाड ,नारळ ज्युस
बटाटा फॅक्टरीचे आश्वासन आहे
लोकांना वाटेल नेत्याचे
केवढे उदार मन आहे
निवडणूकीच्या धुंदीत
असले आश्वासनं देतात
लक्षात आल्यावर नंतर
डोक्यावर हाणुन घेतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*कवी दा. मा. बेंडे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन*
*हायकूचे जग आणि धरित्रीचे देणे*
*अध्यक्ष :- प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी*
*दिनांक :- 05 मार्च 2017*
*वेळ :- *सकाळी 11:00 वाजता*
*स्थळ :- नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स कॉलेज , नांदेड*
*🙏🏻 विनीत 🙏🏻*
*सूर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड*
----------------------------------------------------
*आजचा*
🌀 ~ 💧 *॥ विचार धन ॥* 💧~ 🌀
*कोणताही माणूस दुस-या माणसाला का फसवतो? विश्वासघात का करतो? कारण आहे त्या सुखात, आहे त्या समाधानात माणूस राहू शकत नाही. माणसाला थोडंफार सुख-समाधान मिळत असतंच. पण त्याची जगण्याची, विचार करण्याची बैठक पक्की नसते, कसं जगायचं, हे एकदा निश्चित ठरवलं की आहे त्या सुखा-समाधानातही माणूस छान राहू शकतो.*
*आहे त्या आनंदात समाधान न मानणारी माणसे स्वत:ला आणि इतरांनाही छळत असतात. सुख, समाधान कधी कुणाला मिळालेच नाही असे होत नाही. संकटे आली की माणूस म्हणतो, हे माझ्याच वाट्याला काय आले. एक! दु:खाच्या ठोकरीने तो सुखाच्या जागा विसरून जातो. सुखाशी कृतघ्न होतो. पण तो विसरतो, संकटे येण्यापूर्वी तो पावसात भिजला होता. त्याने सुर्योदय पाहिला होता. फुलांनी बहरलेली झाडं पाहिली होती. उन्हाळ्यात जांभळं खाताना एकमेकांना वाकुल्या दाखविल्या होत्या. सुखाच्या जागा आपल्याजवळच असतात.*
🌹 *॥ रामकृष्णहरी ॥*🌹
🍁🍁🍁🍁🍁🍁
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध..........✍🏻
====================
पायरीच्या दगडावर उभे राहून लोक मंदिरावर असणा-या कळसाची स्तुती करतात.पण लोकांना कुठे माहित आहे की,कळस हा बांधलेल्या मंदिराच्या शिखरावर आहे ,मंदिर हे मजबूत असलेल्या पायावर उभे आहे आणि पाया हा पायरीपासूनच सुरू असतो आणि पायरी ही दगडाचीच बनलेली असते.जर एखाद्या पायरीचाच दगड बाजूला झाला तर मंदिरातही जाणे अवघड जाते आणि कळस पाहणेही त्यापेक्षा अवघड.एवढेच नाही तर पायरीविना कळस कसा बरे उभा राहील.कळसाला लोक दुरुन पाहतात तर पायरीला अगदी जवळून. पायरीवर डोक ठेऊन नमन करतात.पायरीचा दगड जरी असला तरी वरच्या कळसापेक्षा अधिक महत्व पायरीला देतात.त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसावरच मोठ्या माणसांचे जीवन अवलंबून आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. लहान आणि सामान्यपणे जीवन जगणा-या माणसाकडेदेखील इतरांनी त्यांच्याकडे वेगळ्यादृष्टीने पाहू नये. कारण त्यांच्या कष्टावरच मोठ्या लोकांचे जीवन अवलंबून आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷
-------------------------------------------------------
🔵 *आजची बोधकथा*🔵
••●===◆==◆===●••
*❃ परोपकार ❃*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
"अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात.
ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात.
मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात.
गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात.
*_🌀तात्पर्य_ ::~*
जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "*
*प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment