F M Buletin 06 March 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 06/03/2017 वार - सोमवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१८९६ : पहिल्या ऑलिंपिक सामन्याचे (पुनरुज्जीवित) उदघाटन
⌛१९५२ : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.
⌛१८६९ : दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ एक जुलैपासून होणार जीएसटीची अंमलबजावणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
2⃣ राज्यात ८९४ कोटींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, लातूरमध्ये ४०२ कोटींची भरपाई दिली आहे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3⃣ महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 18 मार्चला विधिमंडळासमोर मांडला जाणार
4⃣ नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार निवडून आल्या आहेत. तर उपमहापौरपदी भाजपाचे दीपराज पार्डीकर विजयी झाले.
5⃣ मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना हवा असेल, त्यांना आता आधार कार्डही सादर करावे लागेल, मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला निर्णय
6⃣ रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पारितोषकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती महिला मल्ल साक्षी मलिकने केले स्पष्ट
7⃣  फलंदजांची कसोटी घेणाऱ्या चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाने अतिबचावात्मक पवित्रा घेतला आहे. चहापानाला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद 163 धावा झाल्या होत्या. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्थानिक बातमी -*
प्रा. दा. मा. बेंडे लिखित हायकूचे जग आणि धरित्रीचे देणे पुस्तकाचे जेष्ठ साहित्यिक व कादंबरीकार प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी आणि सुप्रसिध्द कवियत्री डॉ. वृषाली किन्हाळकर, साहित्यिक डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या हस्ते नांदेडमध्ये प्रकाशन
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे...
💕 *"Life is very beautiful"*💕

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *विश्वास*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर
👤 मीनल आलेवार
👤 राज शंकरोड, येवती
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

   *" तडजोड "*

सत्तेसाठी शेवटी
तडजोड आहे
भांडणारी सवतही
आता गोड आहे

सत्तेसाठी सवतीही
होतात की हो गोड
लक्षात ठेवा शेवटी
ज्याची त्याला ओढ

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
🌀 ◆☆ *॥ विचार धन ॥*☆◆ 🌀

*आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.*

*संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.*
         *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"*
           
        😢 *॥ रामकृष्णहरी ॥* 😢    
           🔰🔰🔰🔰🔰🔰
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯  विचारवेध.........✍🏻
==================

वेळेचे भान ठेऊन व कामाची गती पाहून किती आपण हाती घेतलेल्या कामात किती मेहनत घ्यायची हे आपण ठरवावे.कारण आपल्या कामाचा उत्कृष्ट दर्जा हा वेळ आणि काम यांच्यावरच अवलंबून आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद-9421839590.

🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*

पहिल्या वहिल्या भेटीत माणसं कितीजवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का? मैत्री म्हटलं की खरं तर हिशोब, गणित वैगेरे व्यवहारीक शब्द टिकतच नाहीत, पण तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?
~ वपु काळे | प्लेझर बॉक्स

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
      
        " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.
एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.
शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.
हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले

*तात्पर्य-* फक्त सौंदर्यच सर्व काही नसते. कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत ."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments