F M Buletin 07 March 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 07/03/2017 वार - मंगळवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१७७१ : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
⌛१९८३ : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली.
💥 जन्म :-
⌛१९३४ : नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
⌛१९४२ : उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
⌛१६४७ : दादोजी कोंडदेव.
⌛१९२२ : नटवर्य गणपतराव जोशी.
⌛१९६१ : गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री.
⌛१९५२ : परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ ई. वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2⃣ देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एकाहून एक सरस ऑफर आणत आहे. यावेळी एअरटेलने 345 रूपयांत 28 जीबी 3जी/4जी  डेटा आणि सर्व नेटवर्कवर 28 दिवसांसाठी अमर्याद लोकल व एसटीडी कॉल्सची ऑफर आणली आहे. यामध्ये यूजर्सना 500 एमबी डेटा दिवसा आणि 500 एमबी डेटा रात्री  वापरता येणार आहे.
3⃣  उत्तर पश्चिम काश्मीरमध्ये 4.8 तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले.
4⃣ बारावीचे पेपरफुटी प्रकरण सुरूच, आज सकाळी 10.30 वाजता गणिताचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल, वांद्रे येथील परीक्षा केंद्रातून एक जण ताब्यात.
5⃣ तामिळनाडू सरकारच्या विनंतीनंतर एम्सने जयललितांच्या प्रकृतीचा अहवाल आरोग्य मंत्री जे राधाकृष्ण यांच्याकडे सोपवला.
6⃣ लोकसभेचे माजी अध्यक्ष रवी रे यांचे निधन. ते ९१ वर्षांचे होते.
7⃣ बंगळुरू कसोटीत चेतेश्वर पुजारा (खेळत आहे 79) अजिंक्य रहाणे (खेळत आहे 40) यांच्यात पाचव्या विकेटसाठी अभेद्य 93 धावांची भागीदारी, भारताकडे 126 धावांची आघाडी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्थानिक बातमी :-*

विद्या प्राधिकरण, पुणे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था MEPA औरंगाबाद व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, मुरुड जिल्हा लातूर द्वारा आयोजित तीन दिवसीय *शाळा सिध्दी विभागीय कार्यशाळेला* लातूर येथील हॉटेल मयूरा रेजीडेंसी येथे काल पासून प्रशिक्षणास प्रारंभ
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

*साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*,
*आणि हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*,
*जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*.....
*गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*.✌
⚜👉💞🐚⏳💯🐚💞👈⚜

*संकलन :- सुदर्शन उर्फ सुब्बू, हैद्राबाद*
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *अध्यक्ष*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 भीमराव रेणके
👤 मनोज घोगरे
👤 अविनाश मोटकोलू
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

   *" सत्तेसाठी "*

पायाखाली तुडविले ते
डोक्यावर घेतील
जड झाल्यास डोक्याहून
खाली फेकून देतील

लक्षात ठेवा सत्तेपुरतं
डोक्यावर घेतात
कामा नंतर सरळ
बाजूला फेकून देतात

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675
  ----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*‼ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा ‼*

शैक्षणिक व्यासपीठ, शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर आयोजित सर्व  *प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा *मोबाईल 📲च्या माध्यमातून आयोजित केली आहे*

*विषय-  शिक्षण क्षेत्रातील माझे वेगळे प्रयोग व परिणाम*

*✅सूचना आपल्यासाठी*-
✍🏻आपण स्वतः लेखन करून खाली नमूद मोबाईल👇🏻 क्रमांकावर  लेखन केलेला निबंधाचा फोटो व्यवस्थित काढून पाठवावा.
✍🏻निबंध लेखन स्वहस्ताक्षरातील असावा.मुख्याध्यापकाने प्रमाणित केलेला असावा.
✍🏻 लेखन माध्यम मराठी असेल.
✍🏻शब्द मर्यादा -किमान १००० शब्द.
✍🏻विजेत्यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह सन्मानपूर्वक देण्यात येईल.
✍🏻सदरची स्पर्धा राज्यस्तरीय असल्याने पारितोषिक संख्या एकूण सहभागी शिक्षकांच्या प्रमाणात ठरवली जाईल.
✍🏻सर्व सहभागींना आकर्षक राज्यस्तरीय सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
✍🏻 *मोबाईल क्रमांक*-                
विजय गावडे - 9403401348
संभाजी लोहार - 9422787045
सुनील कुंभार - 9730281330
एम. आर. पाटील -  7588698541
संजय जगताप - 9421053155
✍🏻सर्व सहभागींचे जमा झालेले निबंध PDF च्या स्वरूपात तुमच्या नावानिशी व्हाट्सअँपवर प्रकाशित करण्यात येतील
✍🏻सहभागासाठी अंतिम दिनांक *१२ मार्च २०१७*
✍🏻 स्पर्धा कमिटीचा निर्णय अंतिम राहील.
*🙏🏻सहभागी व्हा, लेखन कौशल्याचा प्रचार व प्रसार करा🙏🏻*

👉🏻अधिक माहितीसाठी -
श्री. विनायक हिरवे (9423284225) यांच्याशी संपर्क साधावा.

*🤝कृपया उपक्रमशील शिक्षकांनी सदरचा message पुढे इतर ग्रुप वर पाठवावा, ही नम्र विनंती🤝*

*शैक्षणिक व्यासपीठ, शाहूवाडी ता. शाहूवाडी जिल्हा-कोल्हापूर*
----------------------------------------------------
*आजचा*
🙏🏻 🔻~ *॥ विचार धन ॥*~🔻 🙏🏻

*एकदा एक गृहस्थ आपली कैफियत घेऊन संत एकनाथांकडे गेला व म्हणाला...मला कसं जगावं हे समजत नाही, गोंधळल्यासारखं होतं. आपण त्याविषयी काही सांगावं. एकनाथ शांतपणे म्हणाले- "अरे तू तर थोड्या दिवसांचा सोबती आहेस. आठ दिवसांत तुझा मृत्यू होणार आहे. तू परोपकाराची कृत्य कर. जमलं तर दानधर्मही कर. म्हणजे लोक तुला दुवा ही देतील. जेवढं चांगलं करता येईल तेवढं कर, तुझं आनंदी आयुष्य तुला परत मिळेल.*

*त्याप्रमाणे तो सारं करत राहिला. त्यात तो पूर्णपणे मग्न होऊन गेला. हळूहळू आठ दिवस संपले. आठव्या दिवशी तो झोपेतून जागा झाला, आपण जिवंत आहोत हे त्याच्या लक्षात आले. तो एकनाथांना म्हणाला..मी आठ दिवसांनीसुद्धा जिवंत आहे, हे कसे काय? संत एकनाथ म्हणाले-*
    *"त्यालाच तर आयुष्य म्हणतात. आठ दिवसांतील तुझे वर्तन-क्रिया आठवून बघ, म्हणजे आयुष्याचा अर्थ कळेल."*
           
          ⛳ *॥ रामकृष्णहरी  ॥* ⛳
            🍀🍀🍀🍀🍀🍀
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध..........✍🏻*
===================

माणसांच्या अंगी असणारे राग आणि द्वेष हे दोन गुण शत्रूत्व निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर प्रेम आणि सहकार्य हे गुण मित्रत्व निर्माण करण्यासाठी मदत करतात.या जगाला जिंकायचे असेल तर प्रेमानेच जिंकावे लागेल.
कारण खरा धर्म हा माणुसकीचाच आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590.

🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*

जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही, ह्यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगता न येणारी असंख्य दु:खं तो आपल्याबरोबर नेतो.
~ वपु काळे | वन फॉर द रोड

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
------------------------------------------------------
╭════════════╮  
  ▌  ☣ *आजची बोधकथा* ☣       ▌
╰════════════╯
                  *भेट*
एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वतची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला.

               *तात्पर्य*
आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments