✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 08/03/2017 वार - बुधवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*१९७५ : आंतरराष्ट्रीय महिला दिन*
⌛ १९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.
⌛१९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
💥 जन्म :-
⌛१८६४ : मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे
⌛१९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
💥मृत्यू :-
⌛१९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या १०वीच्या परीक्षेला सुरूवात,
2⃣ नोटाबंदीनंतर देशातल्या अब्जाधीशांच्या संख्येत कमालीची घट, अब्जाधीशांची संख्या अकरानं घटली असून, मुकेश अंबानी 26 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आले समोर
3⃣ कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून 'स्वाभिमानी'चे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन. राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक.
4⃣ सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत सात नव्या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव - विश्वास नांगरे -पाटील
5⃣ बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर
6⃣ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी कुलगुरू द.ना.धनागरे यांचे पुण्यात निधन
7⃣ बंगळुरुमध्ये दुस-या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, 112 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाची दाणादाण, 75 धावांनी केला पराभव.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*" परिवर्तन " हा निर्सगाचा नियम आहे, तो न घाबरता मान्य करावा.. संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत...*
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*संघर्ष*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस 🎂*
👤 मारोती भोसले सहशिक्षक, धर्माबाद
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" शुभेच्छा "*
सात्विक सोज्वळपणाचा
महिला कळस असते
तप्त उन्हात फुललेला
महिला पळस असते
सात्विकता सोशिकता
तिच्या कडून आपण घेऊ
निर्भयपणे जगण्यासाठी
आपण तिला शुभेच्छा देऊ
*जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा*
शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*‼ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा ‼*
शैक्षणिक व्यासपीठ, शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर आयोजित सर्व *प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा *मोबाईल 📲च्या माध्यमातून आयोजित केली आहे*
*विषय- शिक्षण क्षेत्रातील माझे वेगळे प्रयोग व परिणाम*
*✅ सूचना आपल्यासाठी*-
✍🏻 आपण स्वतः लेखन करून खाली नमूद मोबाईल👇🏻 क्रमांकावर लेखन केलेला निबंधाचा फोटो व्यवस्थित काढून पाठवावा.
✍🏻 निबंध लेखन स्वहस्ताक्षरातील असावा. मुख्याध्यापकाने प्रमाणित केलेला असावा.
✍🏻 लेखन माध्यम मराठी असेल.
✍🏻 शब्द मर्यादा - किमान १००० शब्द.
✍🏻 विजेत्यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह सन्मानपूर्वक देण्यात येईल.
✍🏻 सदरची स्पर्धा राज्यस्तरीय असल्याने पारितोषिक संख्या एकूण सहभागी शिक्षकांच्या प्रमाणात ठरवली जाईल.
✍🏻 सर्व सहभागींना आकर्षक राज्यस्तरीय सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
✍🏻 *मोबाईल क्रमांक*-
विजय गावडे - 9403401348
संभाजी लोहार - 9422787045
सुनील कुंभार - 9730281330
एम. आर. पाटील - 7588698541
संजय जगताप - 9421053155
✍🏻 सर्व सहभागींचे जमा झालेले निबंध PDF च्या स्वरूपात तुमच्या नावानिशी व्हाट्सअँपवर प्रकाशित करण्यात येतील
✍🏻 सहभागासाठी अंतिम दिनांक *१२ मार्च २०१७*
✍🏻 स्पर्धा कमिटीचा निर्णय अंतिम राहील.
*🙏🏻सहभागी व्हा, लेखन कौशल्याचा प्रचार व प्रसार करा🙏🏻*
👉🏻 अधिक माहितीसाठी -
श्री. विनायक हिरवे - 9423284225 यांच्याशी संपर्क साधावा.
*🤝 कृपया उपक्रमशील शिक्षकांनी सदरचा message पुढे इतर ग्रुप वर पाठवावा, ही नम्र विनंती 🤝*
*शैक्षणिक व्यासपीठ, शाहूवाडी ता. शाहूवाडी जिल्हा-कोल्हापूर*
----------------------------------------------------
*आजचा*
⛳⛳ *॥ विचार धन ॥* ⛳⛳
*आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.*
*ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.*
⛳ *॥ रामकृष्णहरी ॥* ⛳
⛳⛳⛳⛳⛳⛳
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध..........✍🏻*
----------------------------------
रस्ता कोणताही असो तो कधीच कुणाला चुकीच्या दिशेकडे घेऊन जात नाही.चुकतो तो आपण..!आपल्या मनात जे काही विचार असतील त्या विचारानुसार आपण रस्त्यावरुन जातो.मग तुमच्या त्या विचारात चांगले किंवा वाईटही विचार असू शकतील.मग त्यात रस्त्याचा काय दोष ?दोष तर आपलाच आहे ना ? मग केव्हाही चांगले विचार मनात आणून जीवनाला समृद्ध करायचे असेल तर तुमचा कोणताही रस्ता तुमच्या चांगल्याच ध्येयाकडे घेऊन जाऊ शकतो.तो निरंतर तुम्हाला तुमच्या चांगल्या ध्येयाकडेच जा म्हणून सांगतो.
- व्यंकटेश काटकर,
नांदेड
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
----------------------------------------------------
*वपुर्झा*
पहिल्या वहिल्या भेटीत माणसं कितीजवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का? मैत्री म्हटलं की खरं तर हिशोब, गणित वैगेरे व्यवहारीक शब्द टिकतच नाहीत, पण तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?
~ वपु काळे | प्लेझर बाँक्स
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
╭════════════╮
▌ ☣ *आजची बोधकथा* ☣ ▌
╰════════════╯
*तृप्तता*
प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्याआधीच एक संन्याशीबुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला, '' हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्या आता सोन्याच्या मोहोरांनी भरून टाकावे व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहोरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्याच्या मोहोरा संपल्या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळविण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.
*तात्पर्य*
तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment