FM Buletin 02 March 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 02/03/2017 वार - गुरुवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . .  *दिनविशेष . . 📆*

⌛१९७२- अमेरिकेचे ’पायोनिअर-१०’ यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले
💥 मृत्यू :-
⌛१५९८- संत मीराबाई.
⌛१९४९- सुप्रसिध्द कवयित्री, संयुक्त प्रांताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर सौ. सरोजिनी नायडू.
⌛१९८६- डॉ. काशिनाथ घाणेकर.
⌛१७००- छत्रपती राजाराम महाराज.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीतील भराडी देवी यात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज, १० लाख भाविक येण्याच्या अंदाजानुसार नियोजन.
2⃣ मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवड 8 मार्च रोजी होणार
3⃣ रिक्षा चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती, सरकारचे परिपत्रक बेकायद असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले.
4⃣ जळगाव : जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड 21 मार्चला तर पं.स. सभापतीची निवड 14 मार्चला होणार.
5⃣ अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील रेणुका विद्यालय मोहटे या परीक्षा केंद्रावर बारावीचा पेपर देताना डमी विद्यार्थ्यास पकडले, संबधित विद्यार्थ्याला हॉल तिकीट,पेपरसहीत घेतले ताब्यात.
6⃣ विश्वकरंडक स्पर्धेतील नेमबाजीत 50 मीटर पिस्तुल प्रकारात जितू रायने पटकावले सुवर्णपदक
7⃣ चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर सात विकेटने विजय.
🌹अहमदाबाद येथील विनोदी लेखक आणि तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे स्तंभलेखक तारक मेहता यांचे दीर्घ आजाराने निधन

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

जीवनात एवढ्याहि चुका करू नका, कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ....
रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल

*संकलन :- नागनाथ बोधने, नांदेड*
              9764943279
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *स्थगिती*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 गणेश पाटील हतनुरे, पत्रकार
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

*" चोराच्या उलट्या बोंबा "*

कायद्याचे रक्षकच ईथे
कायदा मोडत आहेत
तेच म्हणतात पुन्हा
जास्त गुन्हे घडत आहेत

यालाच तर म्हणतात
चोराच्या उलट्या बोंबा
हे सुधारणार नाहीत
डोक्यात कितीही कायदा कोंबा

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*✏ मुक्तांगण लघूलेखन स्पर्धा 🖍*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*विषय :- स्वच्छता, आरोग्य, सवय*
*कालावधी :- 01 मार्च ते 05 मार्च*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🖌 खालील लिंक वर क्लिक करा आणि आपले लेख पोस्ट करा

https://m.facebook.com/photo.php?fbid=1105322252927881&id=100003503492582&set=a.186311278162321.38277.100003503492582&refid=17&ref=opera_speed_dial&_ft_=top_level_post_id.1105322522927854%3Atl_objid.1105322522927854%3Athid.100003503492582%3A306061129499414%3A2%3A0%3A1491029999%3A-3546630332664654188&__tn__=E

*♻ स्पर्धेचे नियम व अटी वाचा आणि स्पर्धेत सहभागी व्हा ♻*
----------------------------------------------------
*आजचा*
⚓🔅 *॥ विचार धन ॥*🔅⚓

*लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?*
      
*आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे.*
         
        🎪 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🎪
           🎄🎄🎄🎄🎄🎄
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 वि चा र वे ध ......✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰
जो माणूस वास्तव जीवनात समोर असणा-या कोणत्याही कठीन परिस्थितीशी धैर्याने आणि समर्थपणे टक्कर देऊन जीवन जगण्यास तयार होतो तोच जीवनात यशस्वी होतो.जर का त्याने तोंड नाही दिले तर त्याला त्याच्या जीवनात यशस्वी होणे कठीन जाते.म्हणून परिस्थिती कशीही असली तरी त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590/
          8087917063.

🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*

ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो
~ वपु काळे | फॅण्टसी एक प्रेयसी

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
       
                   *मदत*
शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्‍याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्‍या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले

*तात्पर्य*-आपण दुसर्‍याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◑◎✹★✹✹★✹◎◑●•
*✍�संकलन साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments