✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 02/04/2017 वार - रविवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१६७९ : औरंगजेबाने हिंदूवर ‘जिझिया’ कर लावला.
⌛१९७५ : कॅनडामध्ये जगात सर्वात जास्त उंचीचा म्हणजे ५५५.३५ टॉवर बांधून पुर्ण झाला.
⌛२०११ : अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारतचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.
💥मृत्यू :-
⌛१७२० : पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ.
⌛१९३३ : ज्यांच्या स्मरणार्थ रणजी करंडक स्पर्धा घेतल्या जातात, असे प्रसिध्द क्रिकेटपटू रणजितसिंहजी विभाजी जाडेजा.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ जम्मू काश्मिरमधे जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महागार्ग ४४ वरील उधमपूर ते रामबन या १0.८९ कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार शानदार लोकार्पण
2⃣ गोंधळी आमदारांचं निलंबन प्रकरण, 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची माहिती.
3⃣ एप्रिल - मे महिन्यात तापमान अधिक वाढण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
4⃣ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३२ मद्यालये सिलबंद, उत्पादन शुल्क विभागाची माहिती, न्यायालयाच्या निर्णयाचा फटका.
5⃣ सांगली जिल्ह्यातील तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, द्राक्ष बागायतदाराचे कोटयावधीचे नुकसान.
6⃣ रॉजर फेडररने संघर्षपूर्ण लढतीत टॉमस बर्डीच याला नमवीत बिसकेन येथे मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली
7⃣ दक्षिण कोरियाच्या सुंग जि ह्युनवर मात करुन पीव्ही सिंधूचा इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
चांगल्या गोष्टीची लोक पहिल्याने मजा घेतात, नंतर विरोध करतात व शेवटी स्विकार करतात
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*स्विकार*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 राघवेंद्र कट्टी, नांदेड
👤 कृष्णा येरावार, सहशिक्षक, धर्माबाद
👤 उमेश काळे
👤 राजू माळगे, धर्माबाद
👤 विलास थोरमोठे
👤 प्रभाकर पवार
👤 शेख समीर
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" खुर्चीसाठी "*
खुर्चीसाठी दुश्मनाच्या
हातात हात देतात
एकनिष्ठ रहाण्याच्या
आणाभाका घेतात
दोघांचीही निष्ठा
फक्त खुर्ची पुरती
नजर मात्र असते
नगदी माला वरती
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
पद्मशाली फाऊंडेशन तर्फे आयोजित सामुहिक विवाह मेळावा साठी ज्यांना देणगी द्यायचं आहे त्यांनी
*Suraj Ramdas Bommawar*
President, *padmshali foundeshan*
*A/C No--0626104000022880*
IFSC: IBKL0000626
Bank name: *IDBI BANK*
SAOLI dist- Chandrapur
या खात्यात रक्कम जमा करावी हि विनंत
🙏🙏🙏
सामुहिक विवाह स्थळ : मारखंडा ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली
दिनांक 23 एप्रिल 2017
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सहकार्य प्रित्यर्थः बालकिशन शंकरपेल्ली, जालना
----------------------------------------------------
*आजचा*
••●🚩‼ *विचार धन* ‼🚩●•••
*संत कबीर यांनी मानवी जगण्यातल्या खोटेपणावर प्रहार करीत ख-या भक्तीची जाणीव आपल्या रचनांमधून करून दिली. त्या रचना फारच दिलासा देणा-या आहेत. कुणाचीही वेदना ही आपली सहवेदना झाली पाहिजे यावर भर देत संतानी जो विचार मांडला तो अमूल्य जीवनाचा विचार आहे. गुरूस्वरूप असणा-या संताबद्दल कबीर म्हणतात....*
*संगत संतनकी कर ले।*
*जनमका सार्थक कछु कर ले।*
*उत्तम नरदेह पाया प्राणी इसका*
*हित कछु कर ले ॥*
*या सांगण्यातून कबीरांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हेच सांगितले. त्या सार्थकतेच्या पाठीमागे आपण केव्हा आणि कधी जाणार आहेत, याचा विचार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायला हवा. संत हे कृपादृष्टी करणारे असल्याने त्यांच्याकडून कधीही कठोर वागणूक मिळणे अशक्य आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग ही प्रकाशवाट असते.*
••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●••
⭐⭐⭐⭐⭐⭐
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍
________________________
काही माणसांना स्वतःची काळजी नसते आणि जगाचं आता कसं होईल याची काळजी करत बसतात. अशी माणसे ही दिशाहीन असतात.केवळ काहीच न करता स्वतःचे जीवन सुधारु शकत नाहीत तर मग जगाच्या कल्याणाची काळजी करणे व्यर्थच आहे.अशी माणसे इतरांनाही काही करु देत नाहीत. अशा निरर्थकपणे जीवन जगणा-या माणसापासून अलिप्तच राहिलेले बरे.जगासाठी काहीतरी करणारी माणसे बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर देतात.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*जी माणसं साधी असतात त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची गरज नसते, त्यांचे नाव त्यांच्या कर्तृत्वाने व कामाने सिद्ध होत असते*
एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे. खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते. एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला. हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले. मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते. आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले. कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे. ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे. शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल. हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो. मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो. हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे. कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता. शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला. हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते. आणि नंतर ते उडून जातात.
*तात्पर्य*-मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment