✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 03/04/2017 वार - सोमवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛ १९८४ : भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश वर्मा याची दोन रशियन अंतराळवीरांसह अंतराळप्रवासाला सुरुवात
💥 जन्म :-
⌛ १७८१ : स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.
⌛ १८८२ : प्रसिध्द कादंबरीकार नाथमाधव.
⌛ १९१४ : भारताचे पहिले फील्डमार्शल जनरल माणकेशा.
💥 मृत्यू :-
⌛१६८० : छत्रपती शिवाजीराजे भोसले.
⌛ १९९८ : मेरी कार्टराइट, इंग्लिश गणितज्ञ
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महागार्ग ४४ वरील उधमपूर ते रामबन या १0.८९ कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे पंतप्रधान मोदींनी केले लोकार्पण.
2⃣ माळीण आणि परिसरातल्या गावातली पाणीपुरवठा योजनेसाठी 14 कोटींच्या योजनेला मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
3⃣ तुकाराम मुंढे यांचा दणका, पीएमपीएमएलच्या रात्री डुलकी काढणा-या 9 कर्मचा-यांना केलं निलंबित.
4⃣ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश यांनी घेतली आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ
5⃣ Business-standard च्या वृत्तानुसार खोट्या नोटांवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये प्रत्येक चार वर्षानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बदल करण्याच्या विचारात
6⃣ नुवान कुलसेखराची भेदक गोलंदाजी आणि थिसारा परेराची स्फोटक खेळी या बळावर श्रीलंकेने शनिवारी कोलंबो येथील तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशवर ७० धावांनी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
7⃣ इंडिया ओपनमध्ये अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूची कॅरोलिन मरिनवर मात. 21-19 आणि 21-16 ने मिळवला विजय.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्थानिक बातमी :-*
धर्माबाद येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाने विविध उपक्रमा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीचा निर्णय अणि रोकड रहित अर्थव्यवस्थाच्या दिशेने वाटचाल या पार्श्वभूमीवर आज दुपारी 11:30 वाजता भारतीय अर्थव्यवस्थेपुढील सामाजिक व शैक्षणिक आव्हाने या विषयी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु, भारतीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य तथा जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. कमलकिशोर काकाणी अणि प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांनी केले आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
संकल्पाला साधनेची जोड दिल्याने महान यशाची प्राप्ती होते .
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*संकल्प*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 वाकोडे रंगराव संभाजी,पदवीधर शिक्षक
जि प प्रा शा गोंडे महागाव, किनवट
👤 संभाजीराव गुनाले
👤 नागभूषण एम. भूसा
👤 गंगाधर सुगावकर
👤 भागवत जेठेवाड,सहशिक्षक, बरबडा
👤 कामाजी सरोदे
👤 विजय शिंदे
👤 अक्षय पांचाळ
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
" स्वागत "
राज्यभरातील हायवे
मोकळा श्वास घेतील
जेव्हा ख-या अर्थाने
रस्ते दारू मुक्त होतील
खरोखर सारे रस्ते
दारू मुक्त झाले पाहिजे
दारू मुक्त रस्त्याचे
स्वागत केले पाहिजे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
दिनांक 02 एप्रिल 2017 च्या रविवारच्या दैनिक पुण्यनगरी मध्ये पान क्रमांक 06 वर
*लोकसहभागातून शाळेची प्रगती*
हा *नागोराव येवतीकर* यांचा लेख प्रकाशित झाला आहे. खालील लिंक वर आपणास वाचन करता येईल.
http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=4/2/2017%2012:00:00%20AM&queryed=42&a=6&b=53424#
*चला आपल्या शाळेला समृध्द करू या*
----------------------------------------------------
*आजचा*
•••●★‼ *विचार धन* ‼★●•••
*कोणत्याही परिस्थितीत आपण धीर सोडू नये. आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या किंवा अडथळे आले तरी आपण खचून जाऊ नये. कारण परमेश्वर नेहमीच आपल्याबरोबर असतो. सुभक्तिचे जीवन जगणे म्हणजे परमेश्वराबरोबरचे आपले नाते काय आहे हे ओळखून असणे. ज्या गोष्टींना जगात मान्यता मिळते, त्या सगळ्या आपणही केल्या पाहिजेत असे नाही. आपल्या भोवतीचे लोक ज्या मार्गाने चालले आहेत तोच मार्ग आपणही निवडला पाहिजे असे नाही.*
*आपले विकल्प, आपले विचार निराळे असू शकतात. आपले आचरण वेगळे असू शकते. सुभक्तिशील जीवनात समाधान प्राप्त होते. बंधुप्रेमाचा अर्थ हा की, यशाचे ध्येय गाठण्यासाठी आपण स्वार्थी होऊ नये. आपल्या सामाजिक, कौटुंबिक जबाबदा-या आपण विसरू नयेत. व्यक्तिमत्वाचा विकास पूर्ण होतो तो प्रीतीमध्ये. प्रीतीशिवाय आपण काहीच नाही, म्हणून असे म्हटले आहे की, शेवटी प्रीती ही सर्वश्रेष्ठ ठरते.*
•••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••
☘☘☘☘☘☘
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज विचारवेध*
*आयुष्य जगण्याच्या २ पध्दती आहेत पहिली जे आवडते ते मिळवायला शिका आणि दुसरी जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका*
*एक नेहमी लक्षात असू ध्या, आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत...*
*चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात...*
🌼🍃🍂🌾🌿🌱🍁🌾🌿🌱🌼
----------------------------------------------------
*वपुर्झा*
अत्यंत महागडी, न परवडणारी खर्या अर्थाने
ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*स्वकष्टाची प्रचिती मौलिक*
एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला. त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी, असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला. त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले. परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात ते फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही. ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे, याची त्याला जाणीव झाली. आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा लाभते. पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही
*तात्पर्य*-श्रमाचे,प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment