✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 04/04/2017 वार - मंगळवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆
*।। श्रीरामनवमी ।।*
⌛ १९४९ : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.
💥 मृत्यू :-
⌛१९६८ : अमेरिकेतील गांधीवादी निग्रो नेते मार्टीन ल्यूथर किंग (ज्यु.).
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २८ एप्रिलपासून आंदोलन करणार- राजू शेट्टी
2⃣ गोवंशहत्या बंदीवर 10 दिवसात उत्तर द्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश.
3⃣ दिल्लीतील महानगरपालिका निवडणुका आणि देशातील अन्य भागातील पोटनिवडणुकांसाठी भाजपने उत्तर प्रदेशमधीलच ईव्हीएम मशिन्स वापरण्याचा घाट घातला आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला.
4⃣ देशातील सर्वोत्तम 100 विद्यापीठांची यादी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज प्रसिद्ध केली असून, त्यात आयआयएस बंगळुरूने प्रथम क्रमांकावर बाजी मारली तर आयआयटी मुंबईने पटकावले तिसरे स्थान
5⃣ बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपले बस्तान बसवले असुन, प्रियांका चोप्रा जगातील दुसरी सर्वाधिक सुंदर महिला बनली आहे.
6⃣ आयपीएलचे यंदाचे पर्व आजपासून होणार सुरू, त्यानंतर पुढील दीड महिना भारतात सर्वत्र आयपीएलचीच हवा पाहायला मिळेल
7⃣ इंडिया ओपन सुपर सीरिजचं विजेतेपद पटकावल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर घेतली झेप
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*विशेष बातमी :-* केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी, आॅडिट आक्षेप निकाली, पदाधिकारी व अधिका-यांचा समन्वय, सर्व समित्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी, कार्यालयीन स्वच्छता, आस्थापनाविषयक सर्व बाबींची पूर्तता असलेल्या लातूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर उत्कृष्ट पंचायतराज संस्थेचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. २०१६-१७ च्या कामावर राज्यस्तरीय समितीने हे पारितोषिक घोषित केले आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*स्थानिक बातमी :-* लातूर जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड संपन्न, महिला बालकल्याण सभापतीपदी संगीता घुले, बांधकाम सभापतीपदी प्रकाश देशमुख, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी बजरंग जाधव तर समाजकल्याण सभापतीपदी संजय दोरवे यांची निवड.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
प्रयत्नांचा सपाटा एवढा चालू ठेवा कि यशाने धिंगानाच घातला पाहिजे
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*प्रयत्न*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ञ
👤 चंद्रकांत अमलापुरे, प्रा.शि. नायगांव
👤 गणेश जी. कोकुलवार, नांदेड
👤 मारोती ताकलोर
👤 प्रताप रायघोळ, नांदेड
👤 श्रीकांत गोडबोले
👤 अजय राव
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" संघर्ष "*
संघर्ष चालू असतो
ज्याचा त्याच्यासाठी
उभा रहात नाही
कोणी कोणा पाठी
संघर्ष करुन कोणी
मिळवून देतो का न्याय
खायला बसलेत ईथे
सारे दुधावरची साय
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
ही लिंक उघडून फोटो लाईक करा .
https://m.facebook.com/MahaForest.Official/photos/ms.c.eJw9zMENwDAMQtGNKiA2tvdfrGqa9vr0gSqFszCJFaOLLzjMAp0bMqGYeJp~_Iaaw4UwyZto0a~;FM5HogrA~_m1WrM~_fDimEYQB9TcEH8BqFUY316ZIjM~-.bps.a.1265336686883061.1073741831.893137944102939/1272549709495092/?type=3&source=48
मी काढलेला टिपेश्वर, यवतमाळ येथील वाघाचा फोटो महाराष्ट्र वनविभागाने स्पर्धेत ठेवला आहे , या फोटोस फेसबुक पेज वर जितके जास्त लाईक भेटतील तो स्पर्धक जिंकेल. त्या साठी आपले फोटो ला एक लाईक खुप महत्वाचे ठरेल.
कृपया वरील लिंक ओपन करून फोटो लाईक करावा हि विनंती.
-आपलाच-
*सर्पमित्र प्रसाद शिंदे, नांदेड*
----------------------------------------------------
*आजचा*
•••●★‼ *विचार धन* ‼★●•••
*आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.*
*एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
🌹🌹🌹🌹🌹🌹
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध.........✍
--------------------------
तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात सातत्याने करत असलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश हे तुमच्या मनाला समाधान देणारे आहे.प्रयत्नातून मिळालेला आनंद हा तुमच्या जीवनात अधिक महत्वाचा आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
----------------------------------------------------
*वपुर्झा*
माणसाचं मनचं विचित्र ज्या ठिकाणी ज्या अवस्थेत ते असत. तिथं त्याला कधीच राहवस वाटत नाही. जे कायम अन्यत्र रमत त्याला मन म्हणतात.
~ वपु काळे | इतर
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*मुर्खाशी गाठ*
एके दिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्हणाला, ''बिरबल, एक प्रश्न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्कीच नसणार तेव्हा मला त्यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे'' बिरबल म्हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्हा त्यांच्या भेटीतून आपल्याला काय निष्पन्न होणार आहे तेव्हा त्यांच्या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्यांना दरबारात जाण्यापूर्वी चांगला पोशाख घातला आणि त्यांना काही कानमंत्र दिला. बिरबल वडीलांना म्हणाला,'' बादशहा तुम्हाला भेटू इच्छितात, तिथे गेल्यावर तो तुम्हाला कोणतेही आडवेतिडवे प्रश्न विचारेल पण काही केल्या तुम्ही तोंड उघडू नका. एकही शब्द न बोलता गप्प बसून रहा. बादशहा चिडेल, संतापेल पण तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका.'' झाले बिरबलाचे वडील बादशहाच्या दरबारात पोहोचले. बादशहा दरबारात येताच वडीलांनी त्यांना सलाम केला. बादशहाने त्यांना बिरबलाचे वडील म्हणून ओळखले पण बोलायला काही तरी सुरुवात करायची म्हणून त्याने विचारले,'' तुम्हीच बिरबलाचे वडील का'' वडील गप्पच. त्याने पुन्हा विचारले,'' तुम्ही कुठे राहाता, गावाचे नाव काय, शेती कशी आहे, पाऊसपाणी कसे आहे, गावातील मंडळी कशी आहेत,'' असे अनेक प्रश्न विचारले तरी बिरबलाने सांगितल्याप्रमाणे वडील गप्पच होते. शेवटी बादशहा वैतागला, चिडला आणि संतापाच्या भरात बोलून गेला, ''काय बुद्धी झाली आणि या मूर्खाला मी बोलावून घेतले. असल्या मूर्खाशी अशीकशी माझी गाठ पडली की जो साध्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे देत नाहीये.'' बिरबलाचे वडील मूर्ख शब्द ऐकून मनातून संतापले होते पण बिरबलाने सांगितले होते की, काही झाले तरी तोंड उघडायचे नाही. बादशहा कंटाळून निघून गेला व वडीलसुद्धा घरी गेले. त्यांनी हा प्रकार बिरबलाच्या कानावर घातला. बिरबलाने त्यांची समजूत घातली व शांत राहाण्यास सांगितले. चार दिवसांनी जेव्हा बिरबल पुन्हा दरबारात गेला तेव्हा बादशहा बिरबलाला म्हणाला,'' बिरबल मला तुझ्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे तेव्हा तू जवळ ये.'' बिरबल जवळ गेला. बादशहा हळूच त्याला म्हणाला,'' बिरबल, आपली गाठ जर मूर्खाशी पडली तर काय केले पाहिजे'' बिरबल तात्काळ उत्तरला,''महाराज आपण शांत राहिले पाहिजे, गप्प बसले पाहिजे.'' बादशहा म्हणाला, '' ते कसे काय'' बिरबल म्हणाला,'' माझे वडील नाही का तुमच्यासमोर गप्प बसले होते तसेच'' हे ऐकून बादशहाचे तोंड बघण्यासारखे झाले.
*तात्पर्य*
मुर्खाशी वाद घालू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment