06 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 06/04/2017 वार - गुरुवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛ १९१९ : रौलेट अ‍ॅक्टविरुध्द हरताळ पाळण्यात आला.
⌛१९३० : दांडीयात्रा
⌛१६५६ : चंद्रराव मोरे याचा शिवाजी महाराजांनी पराभव करुन रायगड किल्लासर केला व आपली राजधानी केली.
⌛१९९८ : पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.
💥 जन्म :-
⌛१९५६ : दिलीप वेंगसकर, भारतीय क्रिकेटपटू.
💥 मृत्यू :-
⌛ १९५५ : विनायक महाराज मसुरकर, थोर समर्थ संत.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आज संपूर्ण राज्यात इयत्ता पहिली ते आठव्या वर्गासाठी मराठी विषयाची वार्षिक संकलित मूल्यमापन परीक्षा, उद्या होणार गणित विषयाची परीक्षा
2⃣ व्हॉट्सअॅप गोपनीयता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्याचे दिले आदेश.
3⃣ इनकम टॅक्स रिटर्न आणि पॅनकार्डसाठी 1 जुलै 2017 पासून आधार कार्ड बंधनकारक.
4⃣ मालविका सिन्हा यांची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती.
5⃣ कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला 3 महिन्यांची मुदतवाढ, लासलगाव बाजार समितीच्या पाठपुराव्यानंतर मुदत वाढवली.
6⃣  सायना नेहवाल मलेशिया ओपनमधून बाहेर, पहिल्या फेरीतील सामन्यात पराभव झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर.
7⃣ विराट कोहली ठरला विस्डेन क्रिटेटर ऑफ द इयर

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

पारखून  घेतलं तर कोणीच आपलं नसतं..
आणि
समजून  घेतलं तर कोणीच परकं  नसतं...!

*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *पारखून*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 अभिनंदन पांचाळ, धर्माबाद
👤 राजेश सुरकुटवार, धर्माबाद
👤 सय्यद साजिद, पत्रकार, धर्माबाद
👤 पराग नाडकर्णी
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

    *" योगी  "*

मनातलं कळणारा
माणूस योगी असतो
दान करणारा माणूस
निश्चित त्यागी असतो

परंपरा विसरलेत सारे
लोक आता त्यागाची
चळवळ बनली आहे
आता फक्त भोगाची

   शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*
नासा येवतीकर लिखित कथा
*परीक्षा गुरुजींची*

आज सदा पायमोडे गुरूजी फारच चिंताग्रस्‍त दिसत होते. त्‍यांचा चेहरा पूर्ण उतरलेला होता, काय करावे त्‍यांना कळतच नव्‍हते. कारण ही तसेच होते. आज शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र कार्यक्रम अंतर्गत सहामाहीची परीक्षा सुरू झाली आणि वर्गातील अर्धे मूले अनुपस्थित होते.  ज्‍यांना काहीच येत नाही ते नेमके आज परीक्षेला हजर होते आणि ज्‍यांना ब-यापैकी लिहिता-वाचता येते ते गैरहजर होते.............

कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे.

http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_3.html

कथेत काही त्रुटी, उणिवा किंवा दुरुस्ती असेल तर

*बिनधास्त लिहा माझ्या whatsapp क्रमांकावर*
----------------------------------------------------
*आजचा*
••●🌟‼ *विचार धन* ‼🌟 ●•••

*वसंतोत्सवातील उधाण आणि नवचैतन्याचा भर थोडा शमत येतो. झाडांना आलेली कोवळी पालवी चकचकीत रूप धारण करते. विविध रंगाची फुलं मनाला मोहून टाकतात. नव-अनुभूतीच्या स्पर्शानं मनाला उभारी येते आणि चैत्रपालवीच्या साक्षीनं नवीन वर्षाचा आरंभ होतो, वर्षप्रतिपदा ! घराघरातून गुढी उभारून त्याच्या आगमनाचं आम्ही स्वागत करतो.  हिंदू मान्यतेप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. जीवनातील कोणत्याही नवीन कार्यप्रकल्पाची सुरूवात करण्यासाठी 'शुभदिवस.'*

*खरं पाहता हा क्षण असतो गतकाळातील जीवनचक्राच्या पूर्ण झालेल्या एका फे-यात आम्ही काय मिळवलं, याचा शोध घेण्याचा. आत्मपरिक्षण करण्याचा आणि भविष्याचा वेध घेऊन नवा संकल्प निर्धारित करण्याचा. मानवनिर्मित फे-यांच्या वेदनादायी संघर्षातून स्वत:ची मुक्तता केली तरच जीवन आनंददायी होऊ शकेल. गुढीपाडव्याला आपण सर्वांनी आपल्या जीवन-जाणिवांची पुनर्तपासणी करण्याची आवश्यकता आहे. गरज आहे ती मानवनिर्मित अभिलाषांमधून स्वत:ची मुक्तता करून घेणा-या 'संकल्प गुढी' उभारण्याची !*
         
    ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●••
             🚩🚩🚩🚩🚩🚩
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
         9167937040
----------------------------------------------------
*वपुर्झा*

सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!
~ वपु काळे | वपुर्झा

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
        
                 *संघर्षच खरे जीवन*

एका गावात एक म्‍हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्‍हती. ती आणि तिचा नवरा दोघेच होती. पती कसल्‍यातरी आजाराने ग्रस्‍त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती. या म्‍हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्‍हातारी स्‍वाभिमानी असल्‍याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती. लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्‍या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्‍याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्‍हणायला आणि मृत्‍युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. त्‍यांनी ते ऐकले व लगेच तेथे येवून ते म्‍हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे.'' साक्षात मृत्‍यु समोर पाहून म्‍हातारी घाबरली आणि म्‍हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्‍हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्‍यूदेव निघून गेले आणि म्‍हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली.
                     *तात्पर्य*
जीवनापासून पळ काढणे म्‍हणजे समस्‍येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत रा‍हणे, आपले नित्‍यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments