✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 07/04/2017 वार - शुक्रवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*जागतिक आरोग्य दिन.*
⌛ १८२७ : जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.
💥 जन्म :-
⌛१९२० : पंडित रविशंकर, भारताचे प्रसिध्द सतारवादक.
💥 मृत्यू :-
⌛१९४७ : हेन्री फोर्ड, ‘फोर्ड’ मोटार कंपनीचे संस्थापक.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ जीएसटी विधेयकाला राज्यसभेत मंजुरी.
2⃣ प्राइम मेंबरशिप घेण्यासाठी रिलायन्स जिओने दिलेली 15 दिवसांसाची वाढीव मुदत मागे घेण्याचे ट्रायने दिले आदेश
3⃣ आगामी काळात होणाऱ्या पंढरपूर, शिंगणापुर, तुळजापुर व येरमाळा येथील चैत्री यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या वतीने २५० बसेसचे करण्यात आले नियोजन
4⃣ राज्यात लवकरच बैलगाडा शर्यत सुरू होणार, बैलगाडा शर्यतीबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूर. बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिका-यांची परवानगी आवश्यक, प्राण्यांचे हाल केल्यास ५ लाख रुपये दंड किंवा ३ वर्षांची शिक्षा.
5⃣ मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी भरती घोटाळा, संचालक उच्च व तंत्र विभागाचे संचालक धनराज माने यांचे निलंबन.
6⃣ पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.
7⃣ पाकिस्तान कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हकने केली निवृत्ती जाहीर, वेस्ट इंडिजसोबतच्या मालिकेनंतर घेणार निवृत्ती.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी येते. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*मेणबत्ती*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 रामदास धडेकर, सहशिक्षक, उमरी
👤 प्रदीप शिंदे
👤 गंगाप्रसाद इरलोड
👤 परशुराम बल्फेवाड
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" माणसं "*
अगदी दिसतं तसं
कोणीच असत नाही
चेह-यावरून कोणाच्या
काही दिसत नाही
माणसं दिसतात त्या
पेक्षा वेगळे असतात
चांगले किंवा वाईट
माञ सगळे नसतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
नासा येवतीकर लिखित *" संघर्ष "* कथा वाचा प्रतिलिपि वर खालील लिंक उघडून
http://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar/sangharsh?utm_source=android&utm_campaign=content_share
अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा
----------------------------------------------------
*आजचा*
••●🔷‼ *विचार धन* ‼🔷●••
*बहिणाबाई अशिक्षित, अडाणी पण प्रतिभासंपन्न होत्या. पैशानं गरिब मात्र विचारांची, भावनांची श्रीमंती प्रचंड होती. त्यांचा मुलगा सोपानला शाळेतील एका स्पर्धेत, स्वामी विवेकानंदाचा फोटो बक्षिस मिळाला. भगवी वस्त्र, भगवा फेटा, तेजपुंज चेहरा, पाणीदार डोळे, रूबाबदार उभं राहणं. गंमत म्हणून त्यानं आईला विचारलं, ओळख बरं कुणाचा आहे हा फोटो ? शेतात दिवसभर राबणारी एक स्त्री,, तिला कसं माहित असणार विवेकानंद ? तो फोटो बारकाईनं पाहिला व पटकन् म्हणाल्या..." देवाला कुणी रं फेटा बांधलाय ? झ्याक दिसतयं."*
*विवेकानंदाचं वर्णन यापेक्षा उत्तम शब्दांत दुसरं असूच शकत नाही. किती योग्य, किती नेमकं वर्णन ! खरंच, विवेकानंद देवंच होते आध्यात्मातले ! ते देवत्व नेमकेपणानं बहिणाबाई पाहू शकल्या याचं कारण त्यांची 'संवेदनशिलता.' ना शाळेचा परिचय, ना शहराची ओळख, साध्या खेड्यात राहणारी स्त्री. मात्र त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मराठी भाषेच्या खजिन्यातलं रत्न; जणू कोहिनूर हिराच ! आचार्य अत्रेंनी बहिणाबाईच्या कवितांना 'मोहरांचा हंडा' म्हटलयं याचं कारण बहिणाबाईंचं 'संवेदनशील मन !'*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
☘☘☘☘☘☘
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज विचारवेध*
*कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी*
*फक्त* " *शक्ती*" *असून चालत नाही* .
*तर त्याला* " *सहनशक्ती* "
*चीही
जोड असावी लागते* .
*माणुस " *कसा* *दिसतो*" *ह्यापेक्षा*,
" *कसा आहे*" *ह्याला महत्व असतं*...
*कारण शेवटी*,
*सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर *गुणांचं आयुष्य*
*मरणापर्यंत असतं*
----------------------------------------------------
*वपुर्झा*
शब्द भडक नसतो, मागचा भाव, मनातली मळमळ भडक असते.
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
📚 *आजची ज्ञानवर्धक बोधकथा*📚
*"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्रची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे*
*त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून*
*विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण* *वर्षभर काय केले याची आहे.मी आज काय करतो याची नाही.*
*तात्पर्यः*
*"कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.*
*एका दिवसात यश प्राप्त होत नाही. "*▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment