✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 08/04/2017 वार - शनिवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९५० : भारत आणि पाकिस्तान यांच्या लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षर्या.
💥 मृत्यू :-
⌛१८९४ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सुप्रसिध्द बंगाली साहित्यिक व ‘वंदे मातरम्’ ह्या गीताचे रचनाकार
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ उत्तराखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, राज्यातील रुद्रप्रयाग येथे जाणवले 4.0 मॅग्निट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
2⃣ नवज्योतसिंग सिद्धू यांच्या टिव्ही कार्यक्रमांमध्ये काम करण्यावर उच्च न्यायालयाने उपस्थित केला सवाल
3⃣ बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्डचा क्रमांक देणे अनिवार्य,30 जूनपर्यंत पॅन नंबर जमा न केल्यास बॅक खाते बॅकेकडून गोठवण्यात येईल.
4⃣ जर्मनीतील भारताच्या राजदूत म्हणून मुक्ता दत्ता तोमर यांची नियुक्ती
5⃣ मध्य प्रदेशमधील भिंड येथे चाचणी घेण्यात आलेल्या मतदान यंत्रात कोणत्याही प्रकारचा फेरफार अथवा बिघाड आढळला नाही - निवडणूक आयोग
6⃣ एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून एक वर्ष करण्यात आला.
7⃣ पत्रकार हल्लाविरोधी विधेेयक विधानसभेत मंजूर.
8⃣ विधानसभेतील उर्वरित 10 गोंधळी आमदारांचं निलंबन मागे, अर्थ संकल्प सादर करताना गोंधळ घातल्यानं करण्यात आली होती कारवाई.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
. _*नेहमी छोट्या छोट्या*_
_*चुका सुधारण्याचा प्रयत्न करा,*_
_*कारण मनुष्याला डोंगराने नाही*_
_*तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....*_
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*सुधारणा*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 जगन्नाथ लाभशेटवार, सहशिक्षक, उमरी
👤 निलेश कवडे, साहित्यिक
👤 गंगाधर कौडेवार, सहशिक्षक, धर्माबाद
👤 बद्रीनाथ कुलकर्णी
👤 रमेश मोगरेवार
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" वारे "*
फेर बदलाचे
आता वारे आहे
चर्चा काहीही होते
होई पर्यंत काय खरे आहे
बसलेले असतात
सगळेच कसुन कंबर
कोणाला ही वाटते
आता आपलाच नंबर
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
☀ 🌷 *॥ विचार धन ॥* 🌷 ☀
*आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्यांच्याशी आपण संगत करातो, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.*
*देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर संतसंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ? प्रवासात आपल्या शेजारी विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. "सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. संतसंगतीपासून 'सद्भावना' आणि 'सद्विचार' प्राप्त होतात."*
♻ *॥ रामकृष्णहरी ॥* ♻
☘☘☘☘☘☘
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
──━═▣ *आजची बोधकथा*▣═━──
*मूल्य*
एकदा एका माणसाने भगवान बुद्धांना जीवनाचे मूल्य विचारले. भगवान बुद्धांनी त्याच्या हातात एक चमकदार दगड ठेवला आणि सांगितले की बाजारात जाऊन याची किंमत विचारून ये. पण हा दगड तू विकायचा नाहीस. तो माणूस दगड घेऊन बाजारात गेला. पहिल्यांदा त्याला एक फळविक्रेता दिसला, त्याच्याकडे जाऊन त्याने दगडाची किंमत विचारली. फळविक्रेता म्हणाला, मी या दगडाची किंमत म्हणून तुला 12 संत्री देईन. तो माणूस मग एका भाजीविक्रेत्याकडे गेला. भाजी विक्रेत्याने सांगितले, या दगडाच्या बदल्यात मी एक पोते बटाटे तुला देईन. तो दगड घेऊन तो एका सोनाराकडे गेला. सोनार म्हणाला, मी तुला याचे पन्नास लाख रूपये देईन. नाहीतर असे कर. मी तुला दोन कोटी रूपये देतो, पण हा दगड मला दे. तो माणूस म्हणाला, माझ्या गुरूने हा दगड विकायचा नाही म्हणून सांगितले आहे. नंतर तो एका रत्नपारख्याकडे गेला. त्याने ओळखले की हा दगड साधासुधा नसून माणिक आहे. त्याने ते माणिक व्यवस्थित एका आच्छादनावर ठेवले. आणि म्हटले, तुला हे माणिक कुठे मिळाले. अख्ख्या ब्रह्मांडात याची किंमत कुणी करू शकणार नाही, इतके ते मूल्यवान आहे. तो माणूस हैराण होऊन भगवान बुद्धांकडे आला आणि म्हणाला, तुम्ही मला हा एक दगड दिलात पण त्याची किंमत प्रत्येकाने वेगळी सांगितली. भगवान बुद्ध म्हणाले, या दगडाची किंमत फळवाल्याने 12 संत्री सांगितली, तर रत्नपारख्याने त्याला मूल्यवान म्हटले. तुझ्या जीवनाचेही तसेच आहे. तू भलेही हिरा आहेस, पण समोरचा माणूस त्याच्या योग्यतेनुसार तुझे मूल्य, पात्रता ठरवणार हे लक्षात घे.
*तात्पर्य*-प्रत्येकाने स्वत:ला ओळखले पाहिजे. आपण कसे आहोत हे इतरांकडून समजून घेण्यापेक्षा स्वत:च जाणले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment