09 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 09/04/2017 वार - रविवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९५३ : वॉर्नर बंधूंचा पहिला त्रिमितीय (3 D) चित्रपट, हाऊस ऑफ वॅक्स, प्रदर्शित झाला.
💥 जन्म :- 
⌛१९४८ : जया बच्चन, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ शिवस्मारकप्रश्नी न्यायालयात खुलासा करू - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
2⃣ मुंबई पालिकेच्या 2700 कामगारांच्या लढय़ाला यश
3⃣ म्हाडा सोडतीत उपलब्ध होणार 1700 घरे?
4⃣ दहा रुपयांची नाणी स्वीकारली नाही तर फौजदारी गुन्हा
5⃣ मालवाहतूकदारांचा संप मागे
6⃣ भारताकडून बांगलादेशला २९ हजार कोटींचे कर्ज
7⃣ पाकिस्तानी क्रिकेटपटू युनूस खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तो निवृत्त होईल.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे. परंतु कुटुंब आणि मित्रप्रेम हे जीवनाचे मूळ आहे.*
                        
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *मित्रप्रेम*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 सिद्धांत व्यंकटेश चौधरी, नांदेड
👤 संतोष पेंडकर, सहशिक्षक, धर्माबाद
👤 अरुण ऐनवाले, सहशिक्षक, धर्माबाद
👤 कवी भारत सातपुते, लातूर
👤 गंगाधर तोटलोड,
      माजी जि. प. सदस्य
👤 बळवंत अमृतवाड, मुख्याध्यापक

साईबाबा प्रा. शा. धर्माबाद           
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

    "जाणीव "

विशिष्ट वेळी प्रत्येकजण
रिटायर्ड होत असतो
उपभोगत असलेला
काळ जात असतो

रिटायर्ड होण्याची जाणीव
प्रत्येकाला झाली पाहिजे
जाणीव ठेवून प्रत्येकाने
आपले काम केले पाहिजे

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

----------------------------------------------------
*आजचा*
•••●★‼ *विचार धन* ‼★●•••

*कोणत्याही परिस्थितीत आपण धीर सोडू नये. आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या किंवा अडथळे आले तरी आपण खचून जाऊ नये. कारण परमेश्वर नेहमीच आपल्याबरोबर असतो. सुभक्तिचे जीवन जगणे म्हणजे परमेश्वराबरोबरचे आपले नाते काय आहे हे ओळखून असणे. ज्या गोष्टींना जगात मान्यता मिळते, त्या सगळ्या आपणही केल्या पाहिजेत असे नाही. आपल्या भोवतीचे लोक ज्या मार्गाने चालले आहेत तोच मार्ग आपणही निवडला पाहिजे असे नाही.*

*आपले विकल्प, आपले विचार निराळे असू शकतात. आपले आचरण वेगळे असू शकते. सुभक्तिशील जीवनात समाधान प्राप्त होते. बंधुप्रेमाचा अर्थ हा की, यशाचे ध्येय गाठण्यासाठी आपण स्वार्थी होऊ नये. आपल्या सामाजिक, कौटुंबिक जबाबदा-या आपण विसरू नयेत. व्यक्तिमत्वाचा विकास पूर्ण होतो तो प्रीतीमध्ये. प्रीतीशिवाय आपण काहीच नाही, म्हणून असे म्हटले आहे की, शेवटी प्रीती ही सर्वश्रेष्ठ ठरते.*
        •••●‼ *रामकृष्णहरी*  ‼●•••
             ☘☘☘☘☘☘
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
        9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯विचारवेध...........✍
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

जर नशिबानेच सारे काही होत असेल तर कर्म करायचे कशाला ? जे लोक नशिबावर विसंबून राहतात ते कर्माने दुबळे असतात.जे कर्माने दुबळे असतात ते कधीही आपल्या जीवनात काही करू शकत नाहीत. ते सतत नशिबालाच दोष देत राहतात.जे लोक आपल्या हातावर आणि कर्मावर विश्वास ठेऊन कार्य करतात ते जीवनात सदैव प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असतात.म्हणून नशिबापेक्षा आपल्या करीत असलेल्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवावा म्हणजे आपले जीवन सुखी व समाधानी होऊ शकेल.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590/
          8087917063.

🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
----------------------------------------------------
*वपुर्झा*

हा निसर्ग आहे म्हणा किंवा नियती आहे म्हणा. नियती माणसाला कोणत्या तरी दालनात शिखरावर नेऊन पोहचवते आणि त्याच, त्या दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी,  जीवनाच्या दुसर्‍या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य,  अगदी क्षुद्र करुन सोडते.  एका माणसाला छोटा करुन ती दुसर्‍याला मोठा करत नाही, तर एकाच माणसात ती त्याला इथं छोटा तर तिथं मोठा करते.
~ वपु काळे | मी माणूस शोधतोय

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
     
      *❃ संत बहिणाबाई ❃*
    
   बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या. एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला, "मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.

      *तात्पर्य*
   *शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍ साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments