10 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 10/04/2017 वार - सोमवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१८७५ : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाचीस्थापना केली
💥 जन्म :- 
⌛१८९४ : घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
💥 मृत्यू :- 
⌛१६७८ :थोर विदुषी वेणाबाई, रामदासस्वामींची मानसकन्या, प्रवचनकार

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ देशांतर्गत विमान प्रवासासाठी आधार-पासपोर्टची सक्ती?

2⃣ उष्माघाताचा धोका, राज्याचा पारा चढणार, मराठवाडा-विदर्भात येणार उष्णतेची लाट

3⃣ अर्धापूर तालुक्यातील शेतकरी जाणार संपावर

4⃣ जुन्या नोटा कुरियरने पाठवल्या परदेशात

5⃣ तहसीलदारांच्या न्यायिक अधिकारांवर गंडांतर!

6⃣ आर्थिक लाभ थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात

7⃣ उद्धव आणि शहा येणार तीन वर्षांनंतर आमने-सामने

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.

     *संकलक :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)*
                   जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
         09422736775
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *न्यायिक*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 डॉ. शेख mwh, माध्यमिक शिक्षक, नांदेड
👤 नंदू बारडकर, सहशिक्षक, नांदेड
👤 भाऊसाहेब आबा अहिरे
👤 शिवराज सिताराम वडजे, सहशिक्षक, उमरी
👤 नागेश तांबोली
👤 सचिन पवळे
👤 बालाजी मुपडे
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

     *" तत्त्व "*

हितासाठी तत्त्वाला
सोड चिठ्ठी असते
स्वहितासाठी तर
विरोधकाशी गट्टी असते

जो तो पहातो फक्त
आपआपले स्वहित
तत्त्व सोडायला कसे
कोणी नाही भीत

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*

हा विषय आपल्या सगळ्यांच्याच जवळचा.. प्रत्येक वर्षी आपल्या जवळपास एकदा तरी ही चर्चा ऐकू येतेच. मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा या दोघांचेही काही फायदे आणि काही तोटे असू शकतात.. पण मुलांच्या भवितव्याचा विचार करता, आपण नेमकं काय निवडायचं ? मराठी की इंग्रजी ? तुम्हाला काय वाटतं ?

http://beta1.esakal.com/saptarang/should-we-prefer-primary-school-education-mother-tongue-39069

हे वरील लिंक वर क्लिक करून आपले मत मांडता येईल.
----------------------------------------------------
*आजचा*
🎋~🌼 *॥ विचार धन ॥*  🌼~🎋

*खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.*

*ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर  फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........*
            *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !*

*एक कवी लिहून जातो.....*
          *......सदियाॅ बित गयी टूटी*
                     *हुई डोर को थामे*   
                *शायद कोई वजह मिल*
                     *जाए जिने की....!*
           
         ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼
           🔶🔶🔶🔶🔶🔶
       *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
                *9167937040*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍
-------------------------
समाजात दुर्जन अथवा वाईट प्रवृत्ती असणा-या माणसांचे वर्चस्व राहू नये म्हणून सज्जन माणसे जन्माला आलेली असतात.त्यांच्या सद्विचारामुळे दुर्जनवृत्तीची माणसे वर तोंड काढू शकत नाहीत त्यामुळे अनेक होणारे अनर्थ टळू शकतात.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
----------------------------------------------------
*वपुर्झा*

प्रश्नांपासून नेहमी पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच. पळवाटा मूक्कामाला पोहचवत नाहीत. मूक्कामाला  पोहचवतात ते सरळ रस्तेच.
~ वपु काळे | वपु

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
     
   *❃ लांडगा आणि सिंह ❃*
      
    एकदा एक लांडगा व एकू सिंह रानात हिंडत होते थांबा मी आता जवळच एका मेंढीचा आवाज ऐकला. त्यावरून इथे जवळच मेंढ्या चरत असाव्यात असं वाटतं. तेव्हा मी पटकन जाऊन एखादी मेंढी तुमच्याकरता घेऊन येतो. असे बोलून लांडगा आवाजाच्या दिशेने गेला. परंतु, तेथे मेंढ्यांच्या जवळच धनगर व कुत्रे उभे होते. ते पाहून लांडगा घाबरला व पळतच सिंहापाशी आला. तेव्हा सिंहाने विचारले,हे काय, तू काहीच आणले नाहीस ? तेव्हा लांडग्याने उत्तर दिले, 'महाराज, तिथे मेंढ्या आहेत खया, पण त्या इतक्या अशक्त आहेत की, त्या सगळ्या खाल्ल्यावरसुद्धा आपलं पोट भरणार नाही !

    *तात्पर्य*
जी वस्तु आपल्याला मिळणे कठीण, तिला नावे ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍ संकलन ✍ साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments