✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 11/04/2017 वार - मंगळवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*हनुमान जयंती*
⌛ १९३० : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.
💥 जन्म :-
⌛१८२७ : महात्मा जोतिबा फुले.
💥 मृत्यू :-
⌛१९२६ : ल्यूथर बरबॅंक, जगप्रसिध्द अमेरिकन व वनस्पतीशास्त्रज्ञ
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ लोकसभेत संविधानातील 123 व्या घटनादुरुस्तीचे विधेयक 2017 पारित
2⃣ इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांनी इजिप्तमध्ये केली तीन महिन्यांच्या आणीबाणीची घोषणा.
3⃣ औरंगाबाद शहरातील ८०० चौकांत १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
4⃣ सीबीआयकडून समृद्ध जीवनची कार्यालये सील, समृद्ध जीवनच्या राज्यासह देशभरातील कार्यालयांवर सीबीआयची कारवाई
5⃣ शाळा सिद्धी कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील 71 शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यस्तरीय पथक जिल्ह्यात दाखल , एका शाळेची दोन दिवस केली जाणार तपासणी
6⃣ कमिशन वाढवून द्यावी या मागणीसाठी 10 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची पेट्रोल पंप मालकाची धमकी
7⃣ भारतीय संघाने उज्बेकिस्तानवर वर्चस्व राखताना आशिया ओशियाना ग्रुप एक डेव्हिस चषक लढतीत ४-१ विजयासह विश्व ग्रुप प्लेआॅफमधील आपले स्थान केले पक्के
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
कार्य करीत रहा, परिणामाचा विचार
करू नका.
संकलक :- *शंकर चौरे* (पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*कार्य*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 दत्तात्रय दळवी
👤 देविदास बस्वदे
👤 विनोद चिलकेवार
👤 संजय मदनराव नागरे
👤 प्रवीण कोडम, संपादक
साप्ताहिक मनपद्मशाली
👤 साईनाथ हवालदार, येवती
👤 माधव गंटोड
👤 सुरेश दिवदेवार
👤 शिवकुमार जाधव, धर्माबाद
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" आग "*
सुर्य आता आग
ओकू लागला आहे
पुढे काय होईल
जो तो घोकू लागला आहे
पुढे पाहिजे असल्यास
थंड गार गार हवा
सर्वांनी पावसाळ्यात
झाडेच झाडे लावा
शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
नागोराव सा. येवतीकर लिखित दैनिक सकाळच्या ई - पेपर वरील
*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*
या लेखावर आलेल्या 24 प्रतिक्रिया वाचा खालील लिंक वर
http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_66.html
----------------------------------------------------
*आजचा*
•••●⚜ ‼ *विचार धन* ‼ ⚜●•••
*जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!*
*पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!*
••●🔰‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●••
🌷🌷🌷🌷🌷🌷
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज विचारधारा*
गुंतण्याच्या प्रक्रियेतून गुंता होऊ देऊ नये. तर गुंतणे हे असं असावं की त्यातून एक रेशीम वस्त्र तयार व्हावं..दोन धाग्यांचा एकमेकाला स्पर्श जरूर व्हावा पण एकमेकांचे बंधन नसावे. दोन धाग्यांनी एकत्र जरूर यावं..एकजिनसी व्हाव; पण एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर राखून!
मैत्री म्हणा, प्रेम म्हणा हे असंच असावं. दोघांना एकमेकांची ओढ असावी पण ती आतून असावी. अंतरीकतेने निघालेली साद ही नेहमी ईश्वरनिर्मीतीचा आभास निर्माण करते. तिथे एक वास्तवतेची झालर असते. एक धागा दुसर्याला तिथे अडकवत नाही किंवा ओढतही नाही पण दोघांच्यामूळे मात्र त्या वस्त्राला एक मजबूत जोड मिळालेली असते. त्यामूळे पाण्याला ओंजळीत धरा..त्याला मुठीत पकडू नका. मुठीत पकडण्याचा प्रयत्न केलात तर पाणी सांडून जाते! हो का नाही ?
www.mayboli.com
----------------------------------------------------
*वपुर्झा*
वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*सिंहाची गुणज्ञता*
एका सिंहाने एक हरिण मारले व त्यांस तो फाडून खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो त्यास म्हणतो, "अरे सिंहा, "या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे ऐकून सिंह म्हणाला, "अरे निगरगट्ट माणसा, "तुझा येथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे मांस तू मागतोस, या तुझ्या निर्लजपणाबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही तर फुकट मरशील मात्र.' हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक मारुन म्हणाला, "अरे भल्या माणसा, भिऊ नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस, इकडे ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग करुन एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला.
*तात्पर्य*
लोचटपणा करुन डोके उठविणाऱ्या माणसाचा लोकास कंटाळा येतो. पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत, त्यांचा परामर्श लोक आपण होऊन घेतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment