✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 12/04/2017 वार - बुधवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९६१ : सोवियेत संघाचा युरी गागारिनअंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.
⌛१९९७ : भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडायांचा राजीनामा.
💥 जन्म :-
⌛१८७१ : वासुदेव आपटे, आनंद या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक व संपादक.
⌛१९१० : पु.भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) , मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक.
⌛१९८१ : तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣
2⃣ कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी भारत सर्व प्रयत्न करणार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
3⃣ जीएसटी प्रणालीमुळे कर चोरीला आळा बसेल आणि करदात्यांनाही सुविधा मिळेल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम
4⃣ मध्य प्रदेशमध्ये 1 मे पासून प्लास्टिक पिशवीवर बंदी कॅबिनेटच्या बैठकीत झाला निर्णय
5⃣ लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार - रंगभूमी (महिला) क्षेत्रातील पुरस्कार सुकन्या कुलकर्णी यांना जाहीर, डॉक्टर उल्हास पाटील आणि सुनील तटकरे यांच्या हस्ते गौरव.
6⃣ IPL - गोलंदाजांच्या अचूक कामगिरीनंतर हाशिम आमला आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या धडाक्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल १० मधील सलग दुसरा विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा धुव्वा उडवला.
7⃣ भारतीय शालेय हॉकी संघाने चीनचा १०-० गोलने धुव्वा उडवित ५व्या आशियाई शालेय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत केला प्रवेश
आंतर जिल्हा बदलीसाठी धुळे जि.प.शिक्षण विभागाला 832 प्रस्ताव प्राप्त झाले. बदलीची प्रक्रीया होणार ऑनलाइन
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते,
तो भाग्यवान होय.
संकलक :- *शंकर चौरे* ( पिंपळनेर ) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*भाग्यवान*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 बालाजी चुनुपवार, येवती
👤 गजानन कुर्रेवाड, चिकना
👤 मनोज दातार
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" सौभाग्य वाचवा "*
शेतकरी आत्महत्येचे
प्रमाण वाढत आहे
रोजच एक शेतकरी
आत्महत्या घडत आहे
खंबीर मन करून आता
तूच दु:ख पचवलं पाहिजे
आपल्या पत्नीच सौभाग्य
आता तूच वाचवलं पाहिजे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*📰 साप्ताहिक ज्ञानविश्व 🗞*
प्रिय शिक्षक मित्रांनो,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
शिक्षक हा देशाचा कणा असतो. त्यांची विचारधारा चांगली असेल तर सुसंस्कारित मुले घडू शकतात. उपक्रमशील शिक्षक कधीही रिकामा राहत नाही. त्याच्या डोक्यात सदा न कदा काही न काही विचार चक्र चालूच राहतात. त्यामुळे साप्ताहिक ज्ञानविश्व आपल्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. जेथे शिक्षक लोकांना आपले स्वतः चे शैक्षणिक साहित्य तर प्रकाशित होईलच शिवाय शाळेतील विद्यार्थ्याचे साहित्य देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या साहित्य निर्मितीच्या गुणाचे अविष्कार करण्याचा एक छोटा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व शिक्षक मित्रांना आवाहन करण्यात येते की, आपले आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचे साहित्य, नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती, शैक्षणिक वार्ता, उत्कृष्ट शिक्षकांची संपूर्ण माहिती, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची माहिती, पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती, उत्कृष्ट कार्य किंवा सेवा करीत असलेल्या शिक्षकांची माहिती, आवश्यक तेथे छायाचित्रासह माहिती प्रकाशित करण्यात येईल.
आपण करीत असलेल्या कार्याची दखल *साप्ताहिक ज्ञानविश्व* नक्की घेईल. आपली माहिती इतरापर्यंत पोहोचविण्याचा एक सोपा मार्ग.
चला तर मग, उचला लेखणी आणि लिहिते व्हा. आपल्या लेखन कार्यास खुप खुप शुभेच्छा........!
संपादक साप्ताहिक ज्ञानविश्व
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🍁‼ *विचार धन* ‼🍁●•••
*आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?*
*प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.*
•••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••
🍁🍁🍁🍁🍁🍁
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍
________________________
काही माणसांना स्वतःची काळजी नसते आणि जगाचं आता कसं होईल याची काळजी करत बसतात. अशी माणसे ही दिशाहीन असतात.केवळ काहीच न करता स्वतःचे जीवन सुधारु शकत नाहीत तर मग जगाच्या कल्याणाची काळजी करणे व्यर्थच आहे.अशी माणसे इतरांनाही काही करु देत नाहीत. अशा निरर्थकपणे जीवन जगणा-या माणसापासून अलिप्तच राहिलेले बरे.जगासाठी काहीतरी करणारी माणसे बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर देतात.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
----------------------------------------------------
*वपुर्झा*
"दु:ख, आनंद, जय-पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढचं काय ते नवीन. पुन्हापुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण."
~ वपु काळे | काही खरं काही खोटं
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*मूल्य*
एकदा एका माणसाने भगवान बुद्धांना जीवनाचे मूल्य विचारले. भगवान बुद्धांनी त्याच्या हातात एक चमकदार दगड ठेवला आणि सांगितले की बाजारात जाऊन याची किंमत विचारून ये. पण हा दगड तू विकायचा नाहीस. तो माणूस दगड घेऊन बाजारात गेला. पहिल्यांदा त्याला एक फळविक्रेता दिसला, त्याच्याकडे जाऊन त्याने दगडाची किंमत विचारली. फळविक्रेता म्हणाला, मी या दगडाची किंमत म्हणून तुला 12 संत्री देईन. तो माणूस मग एका भाजीविक्रेत्याकडे गेला. भाजी विक्रेत्याने सांगितले, या दगडाच्या बदल्यात मी एक पोते बटाटे तुला देईन. तो दगड घेऊन तो एका सोनाराकडे गेला. सोनार म्हणाला, मी तुला याचे पन्नास लाख रूपये देईन. नाहीतर असे कर. मी तुला दोन कोटी रूपये देतो, पण हा दगड मला दे. तो माणूस म्हणाला, माझ्या गुरूने हा दगड विकायचा नाही म्हणून सांगितले आहे. नंतर तो एका रत्नपारख्याकडे गेला. त्याने ओळखले की हा दगड साधासुधा नसून माणिक आहे. त्याने ते माणिक व्यवस्थित एका आच्छादनावर ठेवले. आणि म्हटले, तुला हे माणिक कुठे मिळाले. अख्ख्या ब्रह्मांडात याची किंमत कुणी करू शकणार नाही, इतके ते मूल्यवान आहे. तो माणूस हैराण होऊन भगवान बुद्धांकडे आला आणि म्हणाला, तुम्ही मला हा एक दगड दिलात पण त्याची किंमत प्रत्येकाने वेगळी सांगितली. भगवान बुद्ध म्हणाले, या दगडाची किंमत फळवाल्याने 12 संत्री सांगितली, तर रत्नपारख्याने त्याला मूल्यवान म्हटले. तुझ्या जीवनाचेही तसेच आहे. तू भलेही हिरा आहेस, पण समोरचा माणूस त्याच्या योग्यतेनुसार तुझे मूल्य, पात्रता ठरवणार हे लक्षात घे.
*तात्पर्य* - प्रत्येकाने स्वत:ला ओळखले पाहिजे. आपण कसे आहोत हे इतरांकडून समजून घेण्यापेक्षा स्वत:च जाणले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment