✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 13/04/2017 वार - गुरुवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९१९ : जालियानवाला बाग गोळीबार – भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
⌛१९३९ : भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
⌛१९४८ : भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.
💥जन्म :-
⌛१९१३ : दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत. मृत्यू
💥 मृत्यू :-
⌛अनंत काकबा प्रियोळकर.
⌛२००८ : दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मतदान यंत्रात छेडछाड करून दाखवाच, असे थेट आव्हान निवडणूक आयोगाने EVM मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करणाऱ्यांना दिले आ
2⃣ कोणत्याही परिस्थितीत आम्ही कुलभूषण जाधव यांना वाचवणार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
3⃣ सोशल मिडियावर इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा पसरविल्या जात आहेत. मात्र, अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली नसून ही अफवा असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आले स्पष्ट
4⃣ महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या खतगुणमध्ये शिल्पसृष्टी उभारणार, सातारा जिल्हा परिषदेचा पुढाकार.
5⃣ अमर महल जंक्शन पूल दुरुस्तीसाठी 1 महिन्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो, पूल दुरुस्ती अधिका-यांची माहिती
6⃣ IPL 10 - सनरायजर्स हैद्राबादला नमवित मुंबई इंडियन्स चा सलग दुसरा विजय
7⃣ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 : भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहची आठ जणांच्या सदिच्छादूतांमध्ये निवड.
💥 माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अखिलेश दास यांचं निधन
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
यशाच्या उंचीवर पोहचण्यासाठी जेवढी मेहनत लागते त्यापेक्षा जास्त मेहनत ती उंची टिकवून ठेवण्यासाठी लागते .
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*मेहनत*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 चि.यश राजेश सब्बनवार, कुंडलवाडी
👤 विठ्ठल वाघमारे, उमरी
👤 अनिल लोकडे, चिकना
👤 अक्षय वाघमारे
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"तोरा "
काही लोक फार
तो-यात मिरवतात
याला त्याला उगीच
बोटावर फिरवतात
त्यांच त्यांना आवडत
बोटावर फिरवायला
कसं काही वाटतं नाही
तो-यात मिरवायला
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*डॉ. आंबेडकरांसारखे होता येईल काय*
खालील लिंक वर लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग वरच लिहा
http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_12.html
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती दिनांक निमित्त अभिवादन
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🔷‼ *विचार धन* ‼🔷●•••
*गीतेच्या दुस-या अध्यायात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.*
*गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.*
•••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••
🌹🌹🌹🌹🌹🌹
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*
भावनेला विवेकाची पराणी हवीच. स्वप्नांना जाग हवी.
~ वपु काळे | हुंकार
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*जीवनाचे रहस्य*
एक माणूस जीवनाला कंटाळला होता. त्याला असे वाटत होते की, इतक्या मोठया जगात आपण एकाकी आहोत. त्याला कोणी जवळ करत नाही, तो कोणाच्या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दुखी राहायचा. वसंत ऋतु आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्याने सुवासाचा दरवळ पसरला होता. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना त्या व्यक्तिने स्वतला घरात कोंडून घेतले होते. अचानक एक छोटी मुलगी दरवाजा उघडून घरात आली व म्हणाली,'' तुम्ही उदास आहात असे दिसते. याचे कारण काय?'' तो म्हणाला,'' माझ्यावर कोणी प्रेम करत नाही.'' ती मुलगी म्हणाली,'' तुम्ही कोणावर प्रेम करता?'' त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली,'' बाहेर येऊन पहा! तुमच्या दारासमोरच प्रेमाचा किती दरवळ आहे.'' तिने त्याचा हात धरून बाहेर पसरलेल्या फुलांच्या ताटव्यात उभे केले. तुम्ही ज्या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा! ते तितकेच प्रेम तुम्हाला देतील.'' त्या मुलीच्या बोलण्याने त्याचा भ्रम दूर झाला आणि त्याचे जीवन आनंदी झाले.
*तात्पर्य*
जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला की जीवन आनंदी होण्यास मदत होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment