✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 15/04/2017 वार - शनिवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛ १९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.
💥 जन्म :-
⌛१४५२ : लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार
💥 मृत्यू :-
⌛१८६५ : अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे.
2⃣ अफगाणिस्तानमधील इसिसच्या तळांवर अमेरिकेने गुरुवारी केलेल्या शक्तिशाली बॉम्बहल्ल्यात 36 दहशतवाद्यांचा झाला खात्मा
3⃣ उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या लवकरच बंद केल्या जाणार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली.
4⃣ डिजीधनचा जो मंत्र भारत सरकारने देशाला दिला आहे. त्याव्दारे अर्थव्यवस्थेत बोकाळलेला भ्रष्टाचार दूर होऊन डिजीधन हे देशातल्या प्रत्येक गरिबाला निजीधन वाटेल व ही योजना गरिबाचा आवाज बनेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीधन मेळाव्यात केले व्यक्त
5⃣ आयकर विभागाने ऑपरेशन क्लीन मनीच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली असून यावेळी 60 हजार लोक त्यांच्या रडारवर
6⃣ IPL 10 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला. यासोबतच मुंबईने आयपीएलमधील सलग तिस-या विजयाची केली नोंद
7⃣ सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात कॅरोलिना मारीनने पीव्ही सिंधूला 21-11, 21-15 असा सरळ दोन गेममध्ये पराभूत केले.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*विशेष बातमी :-* यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र औरंगाबाद शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षक साहित्य संमेलनास आज औरंगाबादच्या MGM परिसरात होणार सुरु.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*स्वीकरणे*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 सुधीर गुट्टे, विस्तार अधिकारी
पंचायत समिती उमरी
👤 सौ वैशाली क्रांतिकुमार भुक्तरे, नांदेड
👤 दत्ताहरी जाधव
👤 प्रा. श्रीराम गोविंद गव्हाणे
👤 मुकुंद एडके
👤 रामकिशोर झवर
👤 चंद्रकांत देवके प्रा. शि. धर्माबाद
👤 बलकेवाड योगेश
👤 संदीप पारने
👤 सुनील पलांडे
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" सुत्र "*
काढणं घालणं सारं
सुञात बसून असतं
फायद्या पुढे कोणाचं
कशात काही नसतं
योग्य सुञ जुळले की
हात जुळवून घेतात
गोडी गुलाबीने दोघे
सारं मिळून खातात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*शाळासिध्दी बाह्यमूल्यमापन गुंडाळले*
http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_14.html
*मुख्याध्यापक लोकांची मार्च अखेर केलेली धडपड वाया*
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🔅‼ *विचार धन* ‼🔅●•••
*'परमार्थ' साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे.*
*भगवंताला 'सर्व' देण्यापेक्षा 'स्व' द्यायला शिका. 'स्व' दिल्यावर 'सर्व' नाही दिले तरी चालेल, कारण ते आपले, आपल्या मालकीचे रहातच नाही. उलट 'सर्व' देऊन 'स्व' द्यायचा राहिला, तर 'सर्व' दिल्याचे समाधान मिळत नाही.*
*"भगवंताला 'स्व' देणे म्हणजे 'मी त्याचा आहे' ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय."*
••●‼ रामकृष्णहरी ‼●••
🔷🔷🔷🔷🔷🔷
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯विचारवेध..........✍🏻
सत्याच्या मार्गावर चालणारी माणसे कधीच कुणाला घाबरत नाहीत.
कारण सत्य हेच त्यांचे असत्याला दूर करणारे प्रभावी शस्त्र आहे.की ज्यामुळे असत्याचा सत्यापुढे काहीच चालू शकत नाही.म्हणून केव्हाही सत्याच्याच मार्गाने चालावे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*
प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यंत
फअसतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणस..! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*युक्ती*
सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट धरू लागला.शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली.
*तात्पर्य*
नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment