16 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 16/04/2017 वार - रविवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛ १८५३ : भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावण्यास सुरुवात झाली
💥 जन्म :- 
⌛ १८६७ : विल्बर राईट, अमेरिकन विमानसंशोधक.
⌛ १८८९ : चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; पेट्रोल प्रतिलीटर 1.39 रुपये तर डिझेल 1.04 रुपयांनी वाढविण्यात आले
2⃣ श्रीनगर लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत फारुख अब्दुल्ला यांनी मिळवला विजय.
3⃣  जलयुक्त शिवार अभियानात सोलापूर जिल्ह्याला मिळाले राजस्तरीय 50 लाखांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
4⃣ कृषी फलोत्पान व स्वच्छता पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शौचालय बांधकामाला प्रोत्साहन मिळावे, म्हणून स्वत: शौचालयाचे बांधकाम करुन केले श्रमदान.
5⃣ पाडुंरग सहकार साखर कारखान्यास महाराष्ट्र सरकारचा सहकार भूषण पुरस्कार जाहीर.
6⃣ मराठा आरक्षणासाठी पुण्यात 10 मे रोजी मोर्चा तर 30 मे रोजी मुंबईत मूक मोर्चा.
7⃣  आयपीएल 10 : केकेआरचा हैद्राबादवर 17 धावानी मात तर दिल्लीचा पंजाबवर 51 धावांनी विजय.

*विशेष बातमी :-* यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र औरंगाबाद शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षक साहित्य संमेलनास काल औरंगाबादमध्ये उत्साहात झाले सुरु.

*एस. एम. नलवार याचे निधन.*
धर्माबाद : ( प्रतिनिधी ) येथील हु. पानसरे हायस्कूलमधील गणित विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक एस. एम. नलवार यांचे आजाराने हैद्राबाद येथे उपचार घेत असताना शनिवारी दुपारी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातु, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी *सातेफळ ता. वसमत. जि. हिंगोली* या मुळ गावी आज सकाळी होणार आहे

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हांला माणूस बनवते, अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो !
*संकलक :-  रामदास पेंडकर, येताळा*
8485849435
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *व्यक्तिमत्व*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 नितीनकुमार अंबेकर
👤 राज नागुल, नांदेड
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

   "शीतल ताई "

ताई तुझ्या बलिदानाने
परंपरा थांबतील का?
तुझ्या वेदना खरंच यांच्या
काळजाला झोंबतील का ?

शीतल ताईची वेदना
काळजाला झोंबू द्या
अनिष्ट परंपरा सा-या
आता खरंच थांबू द्या

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*शिक्षकांनो, लिहिते व्हा......!*

http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html

*साहित्य स्पंदन समूह, कुही आयोजित लेखन स्पर्धा लिहिण्याला पर्याय नाही.....!*
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🍂‼ *विचार धन*  ‼🍂●•••

*सर्व काही भरभरून मिळाल्यावर आणखी ते काय हवं असतं? संसारात सुख असलं की जीवन सार्थकी झाल्याचं समाधान मिळतं. सुख-दु:खाशिवाय जीवनाला अर्थच उरत नाही. माणसाने आहे त्या स्थितीत समाधानी असावं.*
            *घरात लहान मुलं असली की घराला घरपण येतं. त्यांचं हसणं, बोबडं बोलणं, खेळणं, बागडणं मनाला आनंद देतं. अमृतच त्यांच्या ओठावर असताना मधुघटाची कशाला आस धरावी? असा प्रश्नार्थक विचार मनात आल्याशिवाय रहात नाही....*
        *घरात हसरे तारे असता....*
        *मी पाहू कशाला नभाकडे*
        *छकुल्यांची ग प्रशांत वदने....*
        *गोड गुलाबी गाली हसणे*
        *अमृत त्यांच्या ओठी असता*
        *कशास मधुघट हवा गडे...*

*त्यांना हलकेच कुरवाळावे, त्यांचे लाड करावे अशी गोजिरवाण्या वासरांसारखी प्रेमळ लेकरे आणि त्यांच्या सहवासातले स्वर्गसुखाचे क्षण अनुभवताना घरात जणूकाही आनंदाचे सडे पडतात.*
        
       ♻ *॥ रामकृष्णहरी ॥* ♻    
          🌼🌼🌼🌼🌼🌼
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
         9167937040
----------------------------------------------------
*आज विचारधारा*

वाळूच्या घड्याळातील वाळू वरून हळू-हळू खाली येत असते. सुरवाती सुरवातीला वाळू वरच्या भागात जास्त असते. नंतर हळूहळू ती वरून कमी होत जाते.वरच्या अर्धगोलातून वाळू हळूहळू निसटत असते. क्षणांचे असेच असते, आपण हळूहळू पुढे जात असतो, पण हातातून काहीतरी निसटत असते. जे निसटते त्याला पर्याय नसतो. त्याला आवरण्याचा आपल्याला अधिकारसुद्धा नसतो. अश्यावेळी काय करावे.. खालचा अर्धगोल कधी भरेल याची वाट बघावी. निसटणार्‍या क्षणापेक्षा खाली संचित झालेल्या कणांकडे पहावे. असं थोडच आहे की गडावर चढताना दोराच्या दोन्ही टोकांना तुम्ही धरू शकता. काहीतरी मिळवताना काहीतरी सोडावे लागते !
----------------------------------------------------
*वपुर्झा*

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण
 गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
      
     *❃ स्वामी अखिलानंद ❃*
     
    स्‍वामी अखिलानंद हरिद्वारमध्‍ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्‍यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्‍हा त्‍यांना आश्रमाच्‍या शेजारी असलेल्‍या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्‍यांना विचारल्‍यावर शिष्‍य म्‍हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्‍याचे सांगितले. त्‍यांचे फाटलेले कपडे पाहून स्‍वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्‍या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्‍यांनी त्‍या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्‍व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्‍याने भांबावले, त्‍यामुळे ते दोघेही एक शब्‍द स्‍वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्‍वामीजी रागवत म्‍हणाले, तुम्‍हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्‍यावर या तुम्‍हाला प्रसाद द्यायची व्‍यवस्‍था मी करतो.'' दोघेही बिचारे मान-अपमानाची पर्वा न करता स्‍वामीजींना नमस्‍कार करून निघून गेले. दुसरे दिवशी मात्र स्‍वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्‍वामींच्‍या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्‍यासाठी स्‍वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्‍यात स्‍वामीजींचे लक्ष समोरच्‍या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्‍यांच्‍या रोजच्‍या जागेवर झाडावर भिजलेल्‍या अवस्‍थेत रामायण ऐकण्‍यासाठी येऊन बसलेले दिसले. स्‍वामीजींना राहवले नाही व त्‍यांनी त्‍या दोघांच्‍या समोर लोटांगण घातले व त्‍यांच्‍या रामभक्तीला नमस्‍कार केला.

      *तात्पर्य*
  कोणालाही कोणी कमी समजु नये. कोण कुठल्या अधिकाराचा असेल ते सांगता  येत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments