17 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 17/04/2017 वार - सोमवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९७० : चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले
💥 जन्म :- 
⌛१८९१ : यशवंत रामकृष्ण दाते,नामवंत मराठी कोशकार.
💥 मृत्यू :- 
⌛१९७५ : सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
11⃣ महाराष्ट्र दिनी शेतकरी ‘कर्जमुक्ती’ची घोषणा ?
2⃣ पीएफवर ८.६५ टक्के व्याजास हिरवा कंदील
3⃣ मुंबईत उभारणार बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत
4⃣ औरंगाबादेत उष्माघाताने युवकाचा बळी
5⃣ सीरिया बॉम्बहल्ल्यात ७0 बालकांसह १२६ ठार
6⃣ बंदरासाठी ५000 एकर समुद्र बुजविणार?
7⃣ IPL 10 मुंबईचा विजयी चौकार
8⃣ देशभरातील बाजार समित्या ई-तंत्रज्ञानाने जोडणार
🔸तीन शतकांचा सूर्य पाहणार्‍या एमा मोरानो कालवश!

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

*चांगली माणसं व जिवाभावाची मित्र*
       *शंभर वेळा जरी नाराज झाली*
         *तरी त्याची नाराजी दूर करा.*
*कारण किमती मोत्याची माळ जितक्या*
                   *वेळा तुटते,*
  *तेवढया वेळा आपण ती परत ओवतो.*
      *माळ तुटली म्हणून आपण मोती*
                *फेकून देत नाही*
  
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *जिवाभावाची*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 हिंदुजा शिवाजी अन्नमवार, देगलुर
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

      *" शब्द "*

दिला शब्द आता
कोणीच पाळत नाही
शब्द पाळणारा एक
माणूस मिळत नाही

दिल्या शब्दाला माणसाने
नक्की जागलं पाहिजे
माणूस म्हणून खरोखर
चांगल वागलं पाहिजे

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*कथा :- परीक्षा गुरुजींची*

http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_3.html

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे गुरुजींची कशी परीक्षा घेते ते जरूर वाचा*
----------------------------------------------------
*आजचा*
•••●⚜‼ *विचार धन* ‼⚜●•••

*इतरांसारखाच मीसुद्धा एका छोट्या खेड्यात लहानाचा मोठा झालो. तिथं मरण येईपर्यंत राबणा-या बाया पाहिल्या. त्यात आई नावाचीही बाई होती. दिवसभर काम एके काम, हिच त्यांची दैनंदिनी. घर आवर, रोज टोपलंभर भाकरी बडव, घर-गोठा स्वच्छ कर, रांजण-घागरी भरून ठेव, गायी वासरांची देखभाल कर..आणि शेतावर जा. लेकरांना जेऊ घाल..न्हाऊ घाल..पुरूषांना ताटं लाव..मग स्वत: उशीरानं जेव. बाई अशी पुरूषप्रधान कर्फ्यूखाली सतत का करपत गेलीयं ?*

*माती आणि माता काही मागत नाही, पण भरभरून सारं देतात. माया, जिव्हाळा, प्रेम, आधार, सहारा आणि भाकर देणा-या माती आणि माता या श्रेष्ठ विश्वसंस्थाच आहेत, ज्या निर्मोही आहेत. विशाल आणि पवित्र आहेत. पण बाईपणाच्या झिजण्याचं मोल जगात झालं नाही. त्यावर महाकाव्य लिहून झाली असतील, पण 'माय' हा शब्दांपलिकडचा महान ग्रंथ म्हणून शिल्लकच उरणार आहे. " पोलिसांचा कर्फ्यू एक वेळ परवडला, पण परंपरेचा परवडत नाही."*
           
           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
               🌷🌷🌷🌷🌷🌷
       *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
            9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध.........✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰
जेव्हा तुम्ही एकांतामध्ये असता तेव्हा तुमच्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार येतात आणि
मनाला गोंधळून टाकतात. अशावेळी आपल्याला काय करावे नि काय करु नये अशी मनाची द्विधा मनस्थिती होते. काय करावे काही सुचत नाही.
मग अशी परिस्थिती असते तेव्हा एकच करायचे.
मनाला स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी आवडणा-या गोष्टीकडे लक्ष घाला त्यात तुमचे मन रमले की,
आपोआपच तुमची द्विधा असलेली मनस्थिती पूर्ववत होण्यास मदत होते आणि तुमच्या मनातला चाललेल्या गोंधळाला विराम मिळतो.दुसरी एक गोष्ट करा की,ज्यातून तुम्हाला काही पर्याय शोधण्यास मदत होते.
काही संस्कारक्षम,आदर्श विचार,संतांची, थोर व्यक्तींची व विचारवंताची उपदेशात्मक ग्रंथ, पुस्तके किंवा विचार वाचण्यासाठी हातात घ्या.ज्यातून तुम्हाला काही ना काही पर्याय शोधून काढण्यास मदत मिळेल व गोंधळलेल्या मनाला स्थिर ठेवता येईल.कारण हेच ज्ञान आपल्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी व प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करतील.मग पुढील कामासाठी जोमाने लागू शकाल.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590/
           8087917063.

🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*

माणस कृती विसरतात, मात्र हवेत विराणारे शब्द धरून ठेवतात.

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
   
                    *महत्‍व मानवसेवेचे*

एक प्रसिद्ध संत होते. त्‍यांच्‍याकडे शिक्षण घेण्‍यासाठी दूरदूरवरून शिष्‍यगण येत असत. त्‍यांच्‍या शिष्‍य परिवारातील दोन शिष्‍य त्‍यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्‍नान करून पूजापाठ करण्‍यात मग्‍न होते. चार तासांच्‍या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा या रूग्‍णांची सेवा करण्‍यास ते गुरुला मदत करत. त्‍या संतमहात्‍म्‍याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्‍यामुळे स्‍वत पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना निशुल्‍क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्‍त्र, निवारा उपलब्‍ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्‍यांच्‍या उपचारांची व्यवस्‍था करत असत. एकेदिवशी त्‍यांचे दोन्‍ही शिष्‍य त्‍यांच्‍या दीर्घपूजेत व्‍यग्र होते. त्‍याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्‍यादिवशी आश्रमात रुग्‍णांची संख्‍या जास्‍त होती. परंतु दोन्‍ही शिष्‍य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्‍हा निरोप धाडला. त्‍यावर त्‍या दोघांनी नाराजी व्‍यक्‍त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घलू लागले. तेव्‍हा गुरुजींनी त्‍यांना पुढील शब्‍दात मार्गदर्शन केले,''वत्‍सांनो, मी तर व्‍यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्‍यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्‍या बरोबरीची असते. कारण ती निस्‍वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्‍या दोन्‍ही शिष्‍यांचे डोळे उघडले.
                     *तात्पर्य*
ईश्‍वराची जिवंत कलाकृती म्‍हणजे माणूस त्‍याची सेवा म्‍हणजे साक्षात ईश्‍वराची पूजा असते व त्‍या सेवेपेक्षा अन्‍य कोणतीही पूजा ही मोठी नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments