19 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 19/04/2017 वार - बुधवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛ १९७५ : भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.
💥 जन्म :- 
⌛ १८९२ : ताराबाई मोडक, भारतातील सुप्रसिध्द बालशिक्षणतज्ज्ञ.
⌛ मुकेश अंबानी, सुप्रसिद्ध उद्योगपती
💥 मृत्यू :- 
⌛१९१० : अनंत लक्ष्मण कान्हेरे, भारतीय क्रांतिकारक

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ कांद्यांचा लागवडीचा खर्च 20 हजार, हाती आले 1400!
2⃣ जैतापूर प्रकल्पाचे काम २०१८ पासून सुरू होणार
3⃣ शिक्षण संस्थांमध्ये लागू होणार सातवा वेतन आयोग?
4⃣ सावकारकीच्या गुन्ह्याप्रकरणी वकिलास पाच वर्षांची शिक्षा
5⃣ सीबीएसई’ शाळांत दहावीपर्यंत हिंदी विषय अनिवार्य
6⃣ परभणी, लातूर व चंद्रपूर मनपांसाठी आज मतदान
7⃣ शुभवर्तमान... यंदा समाधानकारक पाऊस पडणार
8⃣ महाराष्ट्रासह आठ राज्यातील सुमारे 20 हजार पेट्रोलपंप येत्या 14 मे पासून दर रविवारी राहणार पूर्णपणे बंद
9⃣ आरसीबीचा गुजरात वर 21 धावानी विजय, ख्रिस गेलची वापसी

*शैक्षणिक विशेष बातमी*
शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर तर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असल्याचे संयोजक विनायक हिरवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

मैत्री अशी करा की जग आपलं होईल, माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल, प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल

*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *मैत्री*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 कृष्णा राय
👤 संदीप कातमवाड
👤 सचिन कनोजवार
👤 बालाजी पोरडवार
👤 भक्ती जठार
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

*" देव कोपला "*

लोक म्हणतात
देव कोपला आहे
म्हणून एवढा
सूर्य तापला आहे

देव कधी कोणावर
उगीच कोपत नाही
पाप झाले म्हणून
सूर्य कधी तापत नाही

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*राष्ट्रीय-राज्य शिक्षक पुरस्कार २०१६-१७*

दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय/राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मा. शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५-१६ पासून सदर पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्यानुसार २०१६-१७ च्या शिक्षक पुरस्कारासाठीही इच्छुक शिक्षकांनी
https://www.research.net/r/shikshakpuraskar16-17  या लिंकवर आपले अर्ज दिनांक ३० एप्रिल, २०१७ सायंकाळी ६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे
----------------------------------------------------
*आजचा*
•••●⚱‼ *विचार धन* ‼⚱●•••

*एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.*

*शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.*
*"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."*

     ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●••
            🔆🔆🔆🔆🔆🔆
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
              9167937040
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध..........✍🏻*

====================
प्रत्येकालाच वाटतं की,माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं,आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की,मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ?
याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल.मग मनच सांगायला लागेल की,तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.आपण जर थोडा स्वार्थ जर सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीची नातं जोडलं,त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील.असं जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील.
तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल,संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.

-व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..9421839590.

🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁
----------------------------------------------------
*वपुर्झा*

' रडणं भोगायचं असतं, हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत.आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं. कारणही हवं.’
वपू / तू भ्रमत आहासी वाया

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
    
       *❃ मूर्तीपूजेचे महत्त्व ❃*
   
     स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी ! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार ? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ?' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ?' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले.

   रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेह-याकडे एकवार चोरट्या नजरेने बघून दिवाणजी म्हणाले, ' स्वामी काय बोलता हे ? ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत !' विवेकानंद म्हणाले, 'दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे'. एवढे बोलून ते राजाला उद्देशून म्हणाले, 'राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेले आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचाराचे आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणार्यांची कीव करणे अविचाराचे आहे.' स्वामी पुढे म्हणाले, 'मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे ज्ञानी भक्त जाणतात; परंतु निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट नसल्याने, त्यांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्तीपूजा ही प्रारंभीची पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो'.हे ऐकून राजा अंतर्मुख होऊन विचारात पडला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments