20 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 20/04/2017 वार - गुरुवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९९२ : खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अ‍ॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.
💥 जन्म :- 
⌛१९५० : एन. चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
💥 मृत्यू :- 
⌛१९६० : सुप्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून लाल दिवा वापरणार नाहीत.
2⃣ पनवेल, भिवंडी, मालेगाव महानगरपालिका निवडणूक जाहीर, 24 मे रोजी होणार मतदान.
3⃣ ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू, अभिनेता जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले व अरुण नलावडे यांना राज्य शासनाकडून राज कपूर व व्ही.शांताराम पुरस्कार जाहीर.
4⃣ केंद्रीय मंत्रिमंडळानं आज VVPAT मशिन खरेदीला हिरवा कंदील दाखवला, नवीन व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) मशिन घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंतर कॅबिनेटनं दिली मंजुरी
5⃣ आता ६ ऐवजी ३ मीटरवरची बोटे न दिसणारा ठरणार अंध
सरकारने अंधत्वाचे निकष बदलले
6⃣  चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकेसाठी ६२ टक्के मतदान
7⃣ भारतीय वंशाचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी द. आफ्रिका संघात स्थान मिळाले

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

*गरज संपली की विचारांना डावलणारी माणसं स्वार्थासाठीच जवळ येतात....*
परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली माणसं निस्वार्थीपणे संकटात सुध्दा जवळ येतात....
*स्पष्ट बोलाणाऱ्याला खूप  मित्र मिळत नाहीत....पण चांगले मित्र नक्की मिळतात....!!*

*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *निस्वार्थ*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 साईनाथ मुलकोड, येवती
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

   "पळवाट "

श्रीमंताला  लगेच
अटक अन् सुटका
त्यांच्यावर चा  राग
उगी उगी लटका

काही वेळा पुरते
होतात ते अटक
उघडे असते त्यांना
पळवाटेचे फाटक

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*राज्य शासकीय कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 की 60 वर्षे असावे? याबाबत आपले मत नोंदवा.*                                                                                         💧💧💧💧💧💧💧
दिनांक 24 नोव्हेंबर 2016 रोजी महाराष्ट्र  शासनाने शासकीय कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय किती असावे याचा अभ्यास करण्यासाठी सहा सदस्यांची समिती नेमलेली आहे. शासकीय कर्मचा-यांकडुन याबाबत वेगवेगळी मते मांडली जात आहेत. तरुण कर्मचारी / अधिकारी विशेषत: ज्यांना पदोन्नती मिळण्याची अपेक्षा आहे, अशा कर्मचा-यांना सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे असे वाटत आहे. तर राजपत्रित उच्च पदस्थ अधिका-यांना सेवानिवृत्ती 60 वर्षे वयानंतर असावी असे वाटते.
वयाच्या 58 व्या वर्षी किती कर्मचारी/अधिकारी पुर्ण कार्यक्षमतेने काम करतात? तरुण बेकारांना संधी मिळाल्यास कमी पगारामध्ये आधुनिक व कुशल अधिकारी / कर्मचारी मिळतील. विशेषत: राज्यात असलेली बेकारी कमी करण्यास मदत होईल असे कांही जाणकारांचे मत आहे.                                               〰〰〰〰〰〰〰
*याबाबत आपले मत नोंदविण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.*                                     〰〰〰〰〰〰〰                             http://annakadam.solapurssi.in                                           ♻♻♻♻♻♻♻
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🔹‼ *विचार धन* ‼🔹●•••

*परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....*
             *न मुंह छुपाके जियो*
             *और न सर झुकाके जियो...*
             *गमोंका दौर भी आये*
             *तो मुस्कुरा के जियो...*
*ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!*
             *ये जिंदगी किसी मंजिल पे*
             *रूक नही सकती.....*
             *हर एक मकाम के आगे*
             *कदम बढा के जियो...*.
      
    ••●🔹‼ *रामकृष्णहरी*  ‼🔹●••
             ⚜⚜⚜⚜⚜⚜
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
          9167937040
----------------------------------------------------
*आज*

🎯 विचारवेध............✍🏻

➖➖➖➖➖➖➖➖

नवीन नाते जोडताना जुन्या नात्यांना विसरु नका.असे होऊ नये की,नव्या नात्यात गुरफटून जाऊन आपल्या रक्ताच्या नात्यांना किंवा नातेसंबधांना पार विसरुन जाऊन त्यांच्याकडे सगळ्याच बाबतीत दुर्लक्ष करुन त्यांच्याबद्दलची सहानुभूतीसुद्धा मनात ठेवत नाही.मग अशावेळी नवीन नाते जपण्यात काय अर्थ आहे.नाते असे टिकवा की, त्यात 

आपल्याही नात्यांना व नवीनही नातेसंबंधानांसही घेऊन चालायला शिकले पाहिजे.त्यातच तुमच्या

जीवनाचे खरे कौशल्य आहे.नात्यामध्ये दुरावा न

आणता संबंध अधिक दृढ कसे करता येईल याचा विचार नेहमी केला पाहिजे.कारण कुणाचेही

मन न दुखवता सा-यांच्या जीवनात आनंदाचे,सुखाचे आणि समाधानाचे वातावरण नेहमीसाठी असायला हवे.


- व्यंकटेश काटकर,नांदेड.

  संवाद.942183950/

           8087917063


🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

----------------------------------------------------
*वपुर्झा*

"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."
वपु / तप्तपदी

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
       
*सचोटी*

एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,  साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे. साधू म्‍हणाला, महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.

*तात्पर्य*
ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments