21 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 21/04/2017 वार - शुक्रवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९९७ : भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी
💥 जन्म :- 
⌛१९०९ : ज.द. गोंधळेकर (जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर), मराठी चित्रकार
💥 मृत्यू :- 
⌛१९३८ : कवी सर मुहम्मद इकबाल

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत सकाळी 11 वाजता नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करणार
2⃣ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज ठाण्यात येणार असून येथील अ. भा. सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार
3⃣ नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. सुरेश काकाणी, नंदुरबारचे जिल्हाधिकारी डाॅ. एम.कलशेट्टी आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिद्र प्रतापसिंह यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड, आज मुंबई येथे होणा-या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव.
4⃣ औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवर आता दुपारी 12 ते 4 या वेळेत जडवाहनांना प्रवेशबंदी- पोलीस आयुक्त अमितेश कुमार.
5⃣ भारतात सर्वात जास्त उकाडा शहर चंद्रपूर,  46.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं
6⃣ बॅडमिंटन महिला एकेरीच्या क्रमवारीत पी. व्ही. सिंधूची तिसऱ्या स्थानी झेप
7⃣ आयपीएल 10 - मुंबईचा पंजाबवर आठ गडी राखून विजय.

*विशेष बातमी :-*
2016-17 या वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ला 8.65% व्याज, अर्थमंत्रालयाची मंजुरी.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

*ज्यांनी तुमची धडपड पाहिलीये,,,*
*फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते.....!*
*इतरांना "तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असतां ...!"*

*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *नशीबवान*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 मारोती इबतवार
👤 नीळकंठ काळे
👤 राचेवाड लक्ष्मण
👤 हणमंत पाटील आवरे
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

    *" फेरबदल "*

काही दिवसात पुन्हा
फेरबदल होतील
जुने चेहरे जाऊन
नवे चेहरे येतील

काम करून कोणाला
खरंच मोठं होऊ द्यायचंय
काम करत नाही म्हणून
फक्त खातं काढून घ्यायचंय

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

नासा येवतीकर लिखित कथा  *साहस* वाचा खालील लिंक वर

http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post.html
----------------------------------------------------
*आजचा*
🌀 ~ ⚡  *॥ विचार धन ॥* ⚡ ~ 🌀

*अनेक वेळा जावा-जावा, भाऊ-भाऊ, सासू-सुना, मित्र-मैत्रिणी अशा मानवी नातेसंबंधात रूसण्यामुळे घरं दुभंगली आहेत. रूसण्याच्या वर्तुळाचा विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टीत रूसवे-फुगवे होतात. ज्यांच्यात भांडायची ताकद नसते ते रडत बसतात, दु:खी होतात. बिनबुडाची भांडणं असतात. दुस-याचा रूसवा-फुगवा किती ताणायचा यालाही काही मर्यादा असतात.*

*रूसव्यातला फोलपणा कळला तर राग राहात नाही. आपणही निवळत गेले पाहिजे. रूसवे-फुगवे प्रत्येक नात्यात असतात, म्हणून काय संबंध बिघडावयचे का? सहजगत्या रूसवा निघाला तर ठिक नाहीतर प्रत्येकाचे रस्ते वेगवेगळे असतात. आपण चालत राहायचे. अनाथ असलेला मुलगाही 'नारायण सुर्वे' होऊ शकतो.*

*"कुणावाचून कुणाचे अडत नाही.*
*आपल्या रस्त्याने हसत पुढे निघायचे."*
     
     🍂 *॥ रामकृष्णहरी ॥* 🍂
         🍂🍂🍂🍂🍂🍂
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
               *9167937040*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध........ ✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰

तुम्ही अशाठिकाणी उभे आहात की,तुमच्याजवळ गर्व नाही,पैसा नाही,नाते नाही,मनही चलबिचल झालेले नाही अशा परिस्थितीत फक्त तुम्ही त्या विधात्याला हात जोडून एकाग्र  चित्ताने त्याचे नामस्मरण करीत आहात आणि त्याबरोबर फक्त एकच मागणे मागत आहात की," हे विधात्या मला सुखी ठेव." ही प्रार्थना जशी तुम्ही तुमच्यासाठी केली तशीच एक प्रार्थना आम्हा सा-यांना सुखी ठेव अशी जर केली तर तुम्ही जीवनात येऊन फार मोठे काम केलात असे होईल आणि तो विधाता नक्कीच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करेल.कारण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी नाही तर इतरांच्या कल्याणासाठी त्या विधात्याला मागत आहात.हे तुम्ही सर्वात महान निःस्वार्थ भावनेतून केलेले योगदान आहे हे कधीही आयुष्यात विसरु नका.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
         8087917063.

🌷👏🏻🌷👏🏻🌷👏🏻🌷👏🏻
----------------------------------------------------
*वपुर्झा*

ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की " आता हा असा का वागला ?"
वपु / गुलमोहर

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*

       *हि-यापेक्षा जनता महत्‍वाची*

एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्‍हणाला,''माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''

*तात्‍पर्य :-* आपल्‍या हाती जर सत्‍ता असेल तर त्‍याचा योग्‍य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्‍ट ठरते. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments