✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 22/04/2017 वार - शनिवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*वसुंधरा दिन*०
⌛१९७९ : आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण होगत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले.
💥 जन्म :-
⌛१९२९ : साहित्य समीक्षक डॉ. अशोक रामचंद्र केळकर.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ परभणीमध्ये काँग्रेस तर लातुरात भाजप विजयी
2⃣ प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये देशात जालना जिल्हा प्रथम
3⃣ औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजरच्या इंजिनसह तीन बोगी घसरल्या
4⃣ राज्यातल्या प्रमुख धरणांत केवळ २९ टक्केच जलसाठा
5⃣ रेणापूर, नेवासा, शिराळा नगरपंचायतींसाठी २४ ला मतदान
6⃣ आता पेट्रोल, डिझेल घरपोच!
7⃣ गुजरातनं कोलकातावर चार गडी राखून मिळवला विजय
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
तुमचं कार्य अस असावं कि तुम्हाला डावलून इतरांना संधी देताना तुमच्यापेक्षा डावलणाऱ्यास वाईट वाटलं पाहिजे.
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*डावलून*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 राजेश्वर शंकरराव देशपांडे, सहशिक्षक, धर्माबाद
👤 व्यंकटेश अबुलकोड, समराळा
👤 प्रवीण रेब्बेवार, देगलुर
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"पराभवाचं खापर "
पराभवाचं खापर
दुस-यावर फोडल्या जाते
कारण काही ही असो
वेगळेच जोडल्या जाते
मोठे मन लागते दु:ख
पराभवाचे पचवायला
जो तो तयारच असतो
स्वतःला वाचवायला
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
नासा येवतीकर लिखित *खरी संपत्ती* ही कथा वाचा खालील लिंक वर
http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_37.html
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🍁‼ *विचार धन* ‼ 🍁●•••
*एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.*
*तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.*
*ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.*
••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●••
🍁🍁🍁🍁🍁🍁
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯विचारवेध..........✍🏻
---------------------------
या जगात नकारात्मक विचार करणा-यांची संख्या काही कमी नाही.
अशी माणसे स्वतः काही करु शकत नाहीत आणि इतरांनाही काही करु देत नाहीत. अशी माणसे
मानसिकदृष्ट्या दुबळी असतात.नेहमी कोणत्याही गोष्टीला पहिल्यांदा नकार देतात नि बाजूला होतात. अशा माणसांच्या सानिध्यात कधीही राहू नये.काम करणा-या माणसांचे मनोबल खच्चीकरण करण्यात निष्णात असतात.
माणसाने सदैव कामात मनोबल वाढवणा-या,
कामात प्रेरणा देणा-या माणसांच्या सहवासात राहिले पाहिजे.
ज्यामुळे सतत आपल्या कामात बळ मिळेल व कामात उत्साह वाढेल.
त्यामुळे स्वतःची व पर्यायाने आपल्या कामात प्रगती होईल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🍂🍃🌷🍃🍂🍃🌷🍃🍂🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*
राणी, प्रारंभासाठी सगुण साकाराची ओढ ही महत्वाची बाब आहे; पण कितीही देखणेपणा - देखणेपणा म्हटलं, तरी त्याला सगुण साकाराच्याच मर्यादा छळतात. नावीन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिनी. मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जूळतात, म्हणून मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून नाविण्याची ओढ ही एक सहजावस्था आहे. कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली, तर सगुण साकारापलीकडचं सौदर्य दिसू लागतयं, अनुभवायला मिळतयं अस समजावं. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते, हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम ह्या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत.'
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*❃ संवेदनक्षमता ❃*
एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला. तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं, "आईस्क्रीम कोन केवढ्याला आहे?"
वेटर म्हणाला, "५ रुपये". तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला.
नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला, असं विचारलं.
वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं, "४ रूपये."
तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या. त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो गेला.
वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं. कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता.
आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता. त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती.
स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.
मी प्रत्येक वेळी नाही म्हणतं पण कधीतरी दुसऱ्यांचा विचार करावा
*तात्पर्य*
सर्वजण एकसारखे नसतात. ते आपापल्या परिस्थितीनुसार असतात.!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment