23 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 23/04/2017 वार - रविवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*
       *जागतिक पुस्तक दिवस*
💥 जन्म :- 
⌛ १५६४ (baptised) : विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक.
⌛ १८५८ : पंडिता रमाबाई.
⌛ १८७३ : विठ्ठल रामजी शिंदे, अस्पृश्यतानिवारण करण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे थोर समाजसुधारक
💥 मृत्यू :- 
⌛ सत्यजित रे, जगप्रसिद्ध सिने दिग्दर्शक.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
11⃣ अफगाणिस्तानमधील लष्कर तळावर झालेल्या तालिबानी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध.
2⃣  मुंबईच्या पुनर्विकासाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
3⃣ माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी डी.लिट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
4⃣ वेबसाइटवरील तांत्रिक बिघाडामुळे 'नीट 2017' परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड मिळण्यास विद्यार्थ्यांसमोर अडचण.
5⃣  दिल्लीतील वातावरणात अचानक बदल, सर्वत्र धुळीचे साम्राज्य.
6⃣ जी. श्रीकांत नांदेडचे तर अभय महाजन बीडचे नवे जिल्हाधिकारी
7⃣ आयपीएल 10 - रोमहर्षक सामन्यात पुण्याचा हैदराबादवर 6 विकेटसने विजय, महेंद्रसिंह धोनीच्या फटकेबाजीने मिळाला विजय.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
.
         *कोणत्याही अपेक्षे शिवाय* *कोणाचेही*
*चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!*
*कारण एक जुनी म्हण आहे*
        *"जे लोक नेहमी फुले वाटतात,*
*त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.*
    
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *सुगंध*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 रुपेश रामदास धडेकर, उमरी
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

      " वारे "

आता सगळीकडेच
परिवर्तनाचे वारे आहे
वा-या प्रमाणे उधळतात
हे एकदम खरे आहे

वारे पाहून उधळतात
ते प्रवाहात टिकतात
डळमळीत विचाराचे
प्रवाहा बाहेर टाकतात

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*नमस्कार महाराष्ट्रचे  व्हिडीओ बातमीपत्र*

अल्पावधीतच आपल्या कणखर वाणीने अवघ्या महाराष्ट्र भर आपल्या व्याख्यानातून सुपरिचित असलेले
संभाजी ब्रिगेड चे जिल्हा प्रवक्ते *प्रा. नितीन दारमोड*
नमस्कार महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आले आहेत 
प्रा नितीन दारमोड - 9975805143

https://www.youtube.com/watch?v=VAU2Lc458Mc&feature=youtu.be
Namaskar Maharashtra News

ताज्या बातमी साठी YOUTUBE वर namaskar maharstra वर subcrib करा
----------------------------------------------------
*आजचा*
🌺~🌹 *॥ विचार धन ॥* 🌹~🌺

*नवरा-बायकोमध्ये मतभेद असतातच. तसं पाहिलं तर 90% जोडप्यांमध्ये दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी असतात, त्यामुळे वाद होणं, खटके उडणं स्वभाविकच आहे. परंतु एकाने समंजसपणा दाखवला पाहिजे. कारण वाद टोकाला जाऊन नवरा-बायको विभक्त होणार असतील तर त्या संपूर्ण कुटुंबाची वाताहात होते.*
       
*'लिव्ह-इन' मध्ये नात्याची कमिटमेंट नसते. त्यामुळे त्यात गांभीर्य नसते. एकत्र राहण्यातली नवलाई संपली की त्या नात्याचा कंटाळा येऊ लागतो. कमिटमेंट नसल्यामुळे दोघंही एकमेकांना बांधील नसतात. अंतिमत: अशा नात्याचा शेवट दोघांच्या विभक्त होण्याने होतो. आपल्यावर कुटुंबातल्या इतर सदस्यांबरोबर 'अॅडजस्ट' करण्याचे संस्कार झालेले असतात. वैवाहिक सुखही तसं क्षणिकच असतं, लग्नाची नवलाई संपली की सगळं चाकोरीबद्ध होऊन जातं. पण नवरा-बायको एकमेकांचे मित्र असतील तर त्यांच्या नात्यात सतत एक सकारात्मकता झिरपत असते.*
         
        💝 *॥ रामकृष्णहरी  ॥* 💝
             💓💓💓💓💓
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
               *9167937040*
----------------------------------------------------
*आज*
🎯  विचारवेध.........✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही नात्यामध्ये एकमेकाबद्दलचा विश्वास आणि प्रेम असेल तर ते नाते अधिक घट्ट बनते.
कामापुरते किंवा आपमतलबासाठी निर्माण केलेले नाते कधीच जास्त काळ टिकत नाही.उलट अशा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन जोडलेल्या नात्यामध्ये एकमेकांबद्दल   तिरस्काराची भावना उत्पन्न होते.
तेव्हा नाते जर टिकवायचे असेल तर निःस्पृह भावनेने व आपुलकीने नाते निर्माण करुन ते शेवटपर्यंत कसे टिकतील यासाठी जपले पाहिजे.
हीच ख-या जीवनाची यशोगाथा आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590/
           8087917063.

🌷💐🌷💐🌷💐🌷🌷💐🌷
----------------------------------------------------
*वपुर्झा*

श्वास म्हणजे विश्वाशी सोयरीक. म्हणूनच अत्यंत जिवाभावाची व्यक्ती गेली तर 'मी एक क्षण जगणार नाही' असं अनेक म्हण्तात आणि मागे खुप वर्षे राहतात. त्याचं प्रेम खोटं नसतं, पण विश्वाशी सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना माहीत नसतं.
वपु / सखी

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*

*कोरडी सहानभुती*

एक कोल्हा एका विहिरीत पडला व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. तो आपले डोके मोठ्या मुष्कीलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता. इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला, अरेरे ! मित्रा तूच का आत पडला आहेस ? तिथे तुला फारच थंडी वाजत असेल, आणि तू पडलास तरी कसा विहिरीत ? तुझी स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कसं काय झालं ते तरी मला कळू दे. त्यावर कोल्हा म्हणाला, मित्रा, तू कृपा करून जर एखादी दोरी आत सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा ती मला या वेळी अधिक उपयोगी पडेल. विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर, म्हणजे मी माझी हकीगत तुला सांगतो.

*तात्पर्य*
एखाद्या संबंधाने नुसत्या शब्दांनी खूप कळकळ दाखविण्या पेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तरी त्याची किंमत फार मोठी आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments