✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 24/04/2017 वार - सोमवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
💥 जन्म :-
⌛ १९७३ : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर,
💥 मृत्यू :-
⌛१९४२ : दीनानाथ मंगेशकर, मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ फ्रान्समध्ये राष्ट्रपतीपदासाठी दुस-या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार.
2⃣ उष्माघातामुळे गेल्या चार वर्षांत जवळपास 4620 लोकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी अहवालातून उघड - पीटीआय
3⃣ निवडणूक आयोगाने 16 लाख 15 हजार व्हीव्हीपीएटी मशीन खरेदी करण्यासाठी पत्र केले प्रसिद्ध
4⃣ वीर सावरकर यांचे विचार शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार नक्कीच करेल - विनोद तावडे
5⃣ मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा 'यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार' माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगती' या पुस्तकाला, तर नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार डॉ. जब्बार पटेल यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान
6⃣ यवतमाळमध्ये नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने लाखो क्विंटल तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. नाफेडने शेवटपर्यंत तूर खरेदी करावी यासाठी शेतकरी संघर्ष समितीने सोमवारपासून घुगरी आंदोलनाचा इशारा दिला आहे
7⃣ आयपीएल 10 - कोलकाता विरुद्ध बंगळुरू, कोलकाता नाइट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत विजय, कोलकाताच्या 3 विकेट घेणा-या नॅथन कोल्टर-नाइलला सामनावीराचा पुरस्कार.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. आपण निष्कारण स्वतःच स्वतःला अनेक बंधने घालून घेत असतो. ह्या बांधून घेतलेल्या अनेक दोऱ्या एकदा सोडवून पहा. नक्कीच मोठ्या प्रमाणात आनंद प्राप्त होईल...*
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*बंधन*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 श्रुती नंदनधरे
👤 भूमाजी मामीडवार
👤 महावीर जैन
👤 दत्ता फत्तेपुरे
👤 अनिरुद्ध उत्तरवार
👤 सौ प्रियांका चंद्रशेखर बोबडे - क-हाळे,
पुणे
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"धोका "
धोका ही माणसाला
बरंच काही शिकवतो
जीवनाच्या मंचावर
समृद्ध करत टिकवतो
धोक्यातून ही माणसाने
खुप काही शिकलं पाहिजे
बुध्दीचा वापर करून
माणसाने टिकलं पाहिजे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
नासा येवतीकर लिखित
*जीवन सुंदर आहे.* लेख वाचा खालील लिंक वर
http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_26.html
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🔹‼ *विचार धन* ‼🔹●•••
*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.*
*हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
🔹🔹🔹🔹🔹🔹
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज विचारवेध*
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा, चुकाल तेव्हा माफी मागा अनं कुणी चुकलं तर माफ करा.ll
आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा.ll
प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा.ll
क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका.ll
संकटे ही क्षण भंगुर आहेत, त्यांचा सामना करा.ll
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा.ll
मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो.ll
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.ll
----------------------------------------------------
*वपुर्झा*
कितीही मोठा आवाज केला गेला तरीही तरी तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करील ? केव्हातरी नि:शब्दाची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही. त्याला सीमा नाही. म्हणुनच आक्रोशाला शब्द असतात. अतीव आनंद 'मूक' असतो. माणूस नि:शब्द होतो.
वपु / सखी
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*ससा आणि त्याचे मित्र*
एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"
*तात्पर्य*
मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment