25 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 25/04/2017 वार - मंगळवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛ १९८२ : रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात
💥 जन्म :- 
⌛ १८७४ : गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचासंशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ संशोधक
💥 मृत्यू :- 
⌛ १७४० : थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
2⃣ मुदतीनंतरही तूर खरेदी; पासवानांचा मुख्यमंत्र्यांना शब्द
3⃣ दहशतवाद्यांच्या गोळीबारात पीडीपी नेते ठार
4⃣ खरेदी बंद झाल्याने चाकूर-जळकोटमध्ये शेतकर्‍यांचे ‘तूर जाळो’ आंदोलन
5⃣ यंदा पाऊस चांगला, पण अनियमित -दा. कृ.सोमण
6⃣ के. विश्‍वनाथ यांना फाळके पुरस्कार!
7⃣ आयपीएल 10 मुंबईचा विजयी रथ पुण्याने रोखला
8⃣ भविष्यात टपाल कार्यालयांमध्ये ‘आधार’प्रणित कॅशलेस व्यवहार!
9⃣ बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजन दोषी

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

*कुणी ही आपल्याकडे पाहत नसताना आपले काम ईमानदारीने पूर्ण करणे म्हणजे प्रामाणिकपणा होय*

*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *ईमानदार*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 श्रीकांत जिंदमवार, धर्माबाद
👤 राजेश अवधूतवार
👤 गुरुनाथ तुकाराम मालीपाटील
👤 अनिकेत देशमुख
👤 साईनाथ मदनुरकर
👤 चंद्रकांत तनमुदले, येवती
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

      *" हवा "*

गाडीवरचा गेला आहे
आता लाल दिवा
व्हीआयपी डोक्यातली
काढीण कोण हवा

डोळ्यातली हवा गेल्याशिवाय
पडणार नाही फरक
व्हीआयपी माणसीकतेवाले
असतात त्यांच्यातच गरक

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*
*नासा येवतीकर यांचा पत्रलेखन ते स्तंभलेखन चा प्रवास*

http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_24.html

*लेखक - श्री संतोष कंदेवार, मुख्य लेखाधिकारी, मनपा नांदेड*
----------------------------------------------------
*आजचा*
•••●💧‼ *विचार धन* ‼💧●•••

    *पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान*
   *ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।*

*ज्ञान आणि कर्म यांचा जीवन व्यवहारात अन्योन्य संबंध कसा असावा आणि त्यानं जीवनविकास कसा घडवावा, हा अर्थपूर्ण संदेश या गीतात आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर ज्ञानानं कर्मशील व्हावं आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश या गीतात आहे. सर्व विद्यामंदिरात ज्ञानसाधना कर्ममार्गानंच झाली पाहिजे, कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले पाहिजेत, तरच ज्ञानाचा उपयोग जीवन उभारणीसाठी होईल.*

*विज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी जर विनाशाचा मार्ग दाखवला, तर ते विज्ञान आणि ती विज्ञानाची प्रगती नसलेलीच बरी. विज्ञानानं करूणेच्या चरणाशी नत व्हायला हवं; कारण करूणा हा सामाजिक, सामूहिक उत्थानाचा शांतीमार्ग असतो. या शांतीमार्गाने मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ' ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान ' हा संदेश सर्वांनी अंगी बाणवला पाहिजे.*

      ••●🌴‼ *रामकृष्णहरी* ‼🌴●••
             🌴🌴🌴🌴🌴🌴
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
           9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध............✍🏻
====================
मानवी जीवनाच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सर्वात जास्त महत्वाचे जर योगदान असेल तर ते म्हणजे आपल्या ग्रंथांचे आणि पुस्तकांचे.तेच आपल्या जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.त्यांच्या सहवासात नेहमी रहावे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
         8087917063.

📚📙📚📙📚📙📚📙📚📙
----------------------------------------------------
*वपुर्झा*

दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.
वपु / पार्टनर

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
   
*❃ म्हातारा आणि त्याचा घोडा*
        
        *एक म्हातारा व त्याचा मुलगा* आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणूस त्या म्हातार्‍याला म्हणाला, 'हा लहान मुलगा पायी चालला आहे, त्यापेक्षा तू त्याला घोड्यावर बसव.'
       ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम धरून चालू लागला. पुढे दुसरा माणूस त्या मुलाला म्हणाला, 'आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला घोड्यावर बसून जायची लाज वाटत नाही का?'
       ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला. थोडे पुढे जाताच दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, 'म्हातारा पहा, लहान मूल पायी चाललं असता आपण घोड्यावर बसून कसा चालला आहे?'
           ते ऐकताच त्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसवून घेतले. ते आणखी थोडे पुढे जाताच तोच एक माणूस त्यांना विचारतो, 'हा घोडा तुमचाच का?' म्हातारा म्हणाला, 'हो.' माणूस म्हणाला, 'मला काही खरं वाटत नाही, कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही?'
           ते ऐकताच दोघेही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोड्याला आडवे करून त्यांनी त्याचे पाय बांधले. मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले.
            ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळया पिटून मोठमोठ्याने हसू लागले. तो आवाज ऐकून घोडा बिचकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले. दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व बुडून मरण पावला.

                          *तात्पर्य*
*प्रत्येकजन वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणे व प्रत्येकाला खूष करणे हे काम फार कठीण आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments