✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 26/04/2017 वार - बुधवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
⌛१९६२ : नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
💥 जन्म :-
⌛१४७९ : वल्लभाचार्य, कृष्णभक्तीचा एक वेगळा पंथ पुष्टिमार्ग स्थापन करणारे थोर पुरुष.
💥 मृत्यू :-
⌛१९२० : श्रीनिवास रामानुजन, प्रसिध्द गणिततज्ञ.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ उष्माघाताने नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू, तर हिंगोलीत महिला दगावली
2⃣ नक्षलींविरोधात ‘अफ्स्पा’ विशेषाधिकाराची मागणी
3⃣ छोटा राजनला ७ वर्षांचा कारावास
4⃣ साध्वी प्रज्ञासिंगची नऊ वर्षांनंतर सुटका
5⃣ २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेली सर्व तूर खरेदी करणार
6⃣ झहीर खान-सागरिका घाटगेचा वाङ्निश्चय
7⃣ आयात मालही खरेदी केंद्रावर; शेतकर्यांची मात्र लूट
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खुप शहाणपण लागते. प्रत्येक वेळी निष्कर्ष बरोबर असतीलच असं नसतं. म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*गैरसमज*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 विद्या बायस ठाकुर, साहित्यिक
👤 नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक
तथा स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"दशा "
तूर पेरली म्हणून
उठबशा आहेत
शेतकरी राजाच्या
अशा दशा आहेत
असे होत असेल तर
शेतकरी कसा टिकेल
शेता मध्ये जोमाने
पिक कसं पिकेल
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
वृषाली वानखडे, अमरावती लिखित
*नासा नावात जादू ........*
http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_25.html
*नासा येवतीकर* यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
----------------------------------------------------
*आजचा*
•••●💥‼ *विचार धन* ‼💥●•••
*अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.*
*तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.*
•••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•••
💥💥💥💥💥💥
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 वि चा र वे ध.....✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰
जात्यामधले दाणे जात्यामध्ये जाण्यासाठी कधीच माघार घेत नाहीत.
कारण त्यांना माहित असते की,आज जरी आपण वाचलो तरी उद्या आपल्यावर वेळ येणारच आहे.दुःख बाळगण्याचे काही कारण नाही.उलट आपल्यामुळे इतरांचा जीव वाचतो म्हणजे आपल्याने इतरांना जीवदान मिळते यापेक्षा आपल्या जीवनात महत्वाचे कार्य कोणते ?
असा विचार आपणही केला तर आपल्याही जीवनाचे सार्थकच होईल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
----------------------------------------------------
*वपुर्झा*
आयुष्यभर जे मिळवण्यासाठी झगडलो... ते मला मिळाले. आता पुढे काय??
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
---------------------------------------------------------
╭════════════╮
▌ ☣ *आजची बोधकथा* ☣ ▌
╰════════════╯
*बैल आणि चिलट*
एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!
*तात्पर्य*
काहीजणांना आपण फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment