✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 27/04/2017 वार - गुरुवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली
💥 जन्म :-
⌛१९०९ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
💥 मृत्यू :-
⌛१८९८ : शंकर बाळकृष्ण दीक्षित, ज्योतिष गणिताचे श्रेष्ठ अभ्यासक
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राष्ट्रपती निवडणूक साठी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात गुफ्तगू
2⃣ विजयाचा, सत्तेचा उन्माद करू नका - नितीन गडकरी
3⃣ स्वस्त हवाई सेवेचा आज होणार शुभारंभ
4⃣ सनदी अधिकार्यांच्या नियुक्त्यांत फेरबदल
5⃣ प्रशिक्षणार्थी विमान वैनगंगेत कोसळले
6⃣ कृषी उत्पन्नावर कर आकारण्याची कोणतीही योजना नाही - जेटली
7⃣ मातृत्व प्राप्त झाल्यानंतर कोर्टवर उतरणार - सेरेना विल्यम्स
8⃣ आयपील 10 मध्ये कोलकत्ताने पुण्याला सात विकेटनी हरविले
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
तुमचं कार्य अस असावं कि तुम्हाला डावलून इतरांना संधी देताना तुमच्यापेक्षा डावलणाऱ्यास वाईट वाटलं पाहिजे.
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*डावलणे*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 मनोज तलवारे, शिंदखेडा, धुळे
👤 दत्ता शहाणे, मोबाईल टीचर
गटसाधन केंद्र, धर्माबाद
👤 मधूर कैलास राखेवार, नांदेड
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"वाल्या की वाल्मिक "
आता सा-या वाल्याचे
वाल्मिक होणार आहेत
चांगले वाईट एकाच
गाडीत जाणार आहेत
कोण वाल्या कोण वाल्मिक
कोणी कोणाला म्हणाव
आपण कोण आहेत
ज्याचं त्यानं जाणीव
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
आज 26 एप्रिल रोजी *नासा येवतीकर* यांचा वाढदिवस मित्र परिवार मध्ये उत्साहात साजरा करण्यात आले त्याची ही क्षणचित्रे
https://youtu.be/pdCcaKSPthM
यू ट्यूब वर पहा.
----------------------------------------------------
*आजचा*
•••●❣‼ *विचार धन* ‼❣●•••
*पूर्वी 'थांबला तो संपला' असं म्हटलं जायचं. पण उलट होऊन ज्याच्याजवळ काहीच नाही, तोही धावतो आणि ज्याच्याजवळ सारे काही आहे, तोही तेवढाच धावतो. घर, गाडी, बंगला, शेती आणि त्यापुढे मोठीच मोठी यादी पुर्णत्वास जाण्यासाठी धावपळ सुरूच राहते. 'हवे आहे' ची यादी कधी संपतच नाही, मग धावाधाव कशी संपणार ?*
*प्रत्येक धावणा-याने अतितणावाने, अतिश्रमाने, अतिलालसेने स्वत:चे जीवन अचानक संपवून घेण्यापेक्षा काही काळासाठी घेतलेला 'पाॅज' हा नव्या दमाने धावण्याची ताकद देतो. 'पाॅज' किती घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्वत:ला 'लंबी रेस का घोडा' समजणारे महत्वकांक्षी लोक अतिआत्मविश्वासापोटी मनाचा आणि शरीराचा विचार न करता 'क्षणभर विश्रांती' घेत नाहीत आणि थांबतात ते कायमसाठीच ! असं होता कामा नये.*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●••
💧💧💧💧💧💧
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध.........✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही नात्यामध्ये एकमेकाबद्दलचा विश्वास आणि प्रेम असेल तर ते नाते अधिक घट्ट बनते.
कामापुरते किंवा आपमतलबासाठी निर्माण केलेले नाते कधीच जास्त काळ टिकत नाही.उलट अशा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन जोडलेल्या नात्यामध्ये एकमेकांबद्दल तिरस्काराची भावना उत्पन्न होते.
तेव्हा नाते जर टिकवायचे असेल तर निःस्पृह भावनेने व आपुलकीने नाते निर्माण करुन ते शेवटपर्यंत कसे टिकतील यासाठी जपले पाहिजे.
हीच ख-या जीवनाची यशोगाथा आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐
---------------------------------------------------
*आजची बोधकथा*
╭════════════╮
▌ ☣ *आजची बोधकथा* ☣ ▌
╰════════════╯
*खरे दुःख*
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
*तात्पर्य*
आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment