✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 29/04/2017 वार - शुक्रवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*अक्षय तृतीया*
⌛ महात्मा बसवेश्वर जयंती
💥जन्म :-
⌛ १८४८ : राजा रविवर्मा, नामवंत भारतीय चित्रकार.
⌛ १९३६ : झुबिन मेहता, भारतीय संगीतकार.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ तूर खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार बाजार हस्तक्षेप योजना खरेदी करणार, महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ 5500 रुपये दराने तूर खरेदी करणार
2⃣ निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली म्हणून कोर्टाने आम आदमी पार्टीचे आमदार सोम दत्त यांना समन्स बजावले.
3⃣ जेईई मुख्य परीक्षेत नाशिकची वृंदा राठी देशात मुलींमध्ये प्रथम, राठीला मिळाले 321 गुण
4⃣ नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची जूनमध्ये फेरपरीक्षा होणार, दहावीप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार. राज्य सरकारचा अध्यादेश जारी
5⃣ वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनतेशी संवाद साधला पाहिजे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6⃣ दयावान अभिनेता विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर काल झाले अंत्यसंस्कार
7⃣ आयपीएल 10 : गुजरात लायन्सकडून रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूचा धुव्वा, सात गडी राखून मिळवला विजय
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷
कितीही कमवा
पण कधी गर्व करू नका...
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई
शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात...
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*अक्षय*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 गौतम वाघमारे
👤 नागेश चिंतावार, सहशिक्षक, बिलोली
👤 विवेक बैसकर
👤 सैंडी बियानवाड
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" पटाईत "*
कोण चांगले अन्
कोण वाईट आहेत
चांगले म्हणणारेच
बनवायला पटाईत आहेत
वाईटच जास्त स्वतःला
चांगले म्हणत असतात
आपल्या चांगूलपणाचे
ते घोडे हानत असतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथील इयता चौथ्या वर्गात शिकणारी कु. प्रतिक्षा कैवारे हिचे *रमाई भिमराव आंबेडकर* यांचे वर प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेले भाषण
https://youtu.be/NUB4bS21cJ4
*पहा, सब्सक्राइब करा आणि भाषण आवडल्यास शेयर करा*
----------------------------------------------------
*आजचा*
•••●🔷‼ *विचार धन* ‼🔷●•••
*गीतेच्या दुस-या अध्यायात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.*
*गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.*
•••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••
🌹🌹🌹🌹🌹🌹
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध..........✍🏻
=====================
ज्याप्रमाणे आकाशात पक्षी विहार करतात तेव्हा त्यांची कोणतीही दिशा निश्चित नसते तरीही ते परत आपल्या घरट्याकडे येतात.म्हणजे पोटासाठी दाही दिशा ह्या त्यांच्यासाठी आशेच्याच असतात.जीवन जगणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते.
परंतु मानवाचे उद्दिष्ट थोडे वेगळेच पहायला किंवा अनुभवायला मिळते तो आपल्या हव्यासापोटी धाव धाव धावतो आणि आहे त्या सुखासाठी मूकतो.मग त्याचे दाही दिशा भ्रमण करणे म्हणजे स्वतःच्या जीवनात मिळत असलेल्या सुखासाठी आहे ते सुख नष्ट करुन नको त्या दुःखाला आमंत्रण देऊन जीवनाची घालमेल करुन घेणेच होय.अर्थात दिशाहीन माणसाचे जीवन म्हणजे स्वतःच्या मनाला संकटात टाकून आहे ते जीवन दुःखमय करुन जगणेच होय.मग आपल्यापेक्षा इतर जीव चांगलेच म्हणावे लागतील.
-व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
----------------------------------------------------
*वपुर्झा*
गंध दान करून फुलाला कोमेजण्याचं बळ येतं.
~ वपु काळे | निमित्त
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*❃ श्रीमंत माणूस ❃*
"एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना.
अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले.
काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'
*तात्पर्य*
"माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment