*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 30/12/2016 वार - शुक्रवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९८३ : भारताचे तिसरे पथक अंटार्क्टिक मोहिमेसाठी गेले.
⌛१८०३ : अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.
⌛१९४३ : नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.
⌛१९५३ : जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संचअमेरिकेत विक्रीला. किंमत – १,१७५ डॉलर.
💥जन्म
⌛१८७९ : आधुनिक भारतातील योगीपुरुष रमण महर्षी यांचा तामिळनाडूमधील तरुच्यूली या गावी जन्म.
⌛१८८७ : कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.’भारतीय विद्याभवन’ चे संस्थापक.
⌛१८६५ : रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले. मुंबईत जन्म.
💥मृत्यू
⌛१९७१ : प्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ विक्रम साराभाई.
⌛१९९२ : मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक.
⌛१९७४ : गांधीवादी नेते देशभक्त शंकरराव दत्तात्र्यय देव.
⌛२००१ : हर्षद महेता, भारतीय शेरदलाल.
*संकलन :- सौ. खेडकर सुभद्रा त्रिंबकराव*
मु.अ. जि.प.प्रा.शा. किट्टी आडगाव
ता.माजलगांव जि.बीड
मो.न.9403593764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ झारखंडमधील लालमाटिया येथील कोळसा खाणीत ढिगारा कोसळल्याने काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून अडकलेल्या कामगारांना शोधण्याचे काम सुरू आहे
2⃣ नोटाबंदीचा माझा निर्णय हा भ्रष्टाचारावरील थेट हल्ला, या निर्णयामुळे काळा पैसा जमा करणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिली माहिती
3⃣ पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जुन्या नोटा बागळल्यास आता तुरुंगवास नाही, मात्र कमीत कमी 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार
4⃣ नोटाबंदीच्या काळातही साईचरणी कोट्यवधीचे दान. 50 दिवसांत साईचरणी 31 कोटी 73 लाखांचे दान
5⃣ सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील परभणीचे पालकमंत्री तर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील
6⃣ उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँक आता ऑनलाइन उपलब्ध, ब्लड बँकेतील रक्त साठ्यासह इतर माहिती आता एका क्लिकवर मिळणार
7⃣ भारताचा उदयोन्मुख १० वर्षीय बुध्दिबळपटू गुकेश डी. याने मुंबई आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लक्षवेधी कामगिरी करताना हंगेरीचा ग्रँडमास्टर अॅडम होर्वाथशी केली बरोबरी
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
नातं हा असा दागिना आहे जो सगळयांकडे दिसतो पण जाणवत नाही म्हणुन अशी नाती करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहीजे....
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*उपलब्ध*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 किरण रणवीरकर, विषयतज्ञ,
गटसाधन केंद्र, धर्माबाद
👤 आनंद यडपलवार, प्रा. शि. धर्माबाद
👤 साहेबराव कांबळे, प्रा. शि. नांदेड
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"नेतृत्व "
मोठ्या सावली खाली
छोट झाड वाढतं नसत
एकाच्या जीवावर दुसर
नेतृत्व कधी घडतं नसत
नेतृत्व करायला स्वतः त
असायला लागते धमक
तरच आपल्या नेतृत्वाची
दिसुन येते की हो चमक
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🔔 🔔 ॥ विचार धन ॥ 🔔 🔔
अनेकदा माणसांचे 'अंतरंग' समजून घेण्याचे प्रयास वरपांगी असतील, पूर्वग्रहाने दूषित असतील तर ती व्यक्ती बेगडी, ढोंगी वाटण्याची शक्यता असते. स्वत:चे मन निर्लेप केल्याशिवाय आम्ही इतरांशी संवाद साधूच शकणार नाही.
अनेकदा लहानशा गैरसमजातून अतिशय जिवलग मित्र, सहकारी, प्रिय माणसे दूर जाताना दिसतात. त्या दोघांनाही एकमेकांबद्दलची ओढ नि आत्मियता बेचैन करीत असते. परंतु हा दुरावा दूर करण्यासाठी पुढाकार कुणी घ्यायचा, या अहंकारात माणूस अधिकच दुरावत जातो. आत्मपिडा सहन करूनही अहंकाराला दूर सारू न शकणारी मानवी भावना अधोरेखित करताना संवेदनशिल मनाचे कवी गुलजार म्हणतात....
तुम्हे ये जिद् थी की हम बुलाये
हमे ये उम्मीद के वो पुकारे....
है नाम होठों पे अब भी लेकिन
आवाज में पड गयी दरारें.....!
⭐🌹॥ रामकृष्णहरी ॥🌹⭐
☀संजय नलावडे, मुंबई ☀
========***********=========
*आजची लिंक*
हणमंत पडवळ यांची कल्पतरु सम तो स्पर्धेतील लेख
*आमचा बाप*
http://marathi.pratilipi.com/hanamant-padwal/aamcha-baap
========***********=======
*आजची बोधकथा*
*पश्चाताप*
एका विद्यालयातील प्रसंग आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना दररोज प्रयोगशाळेत प्रयोग करावे लागतात. काही विद्यार्थ्यांना असे प्रयोग करायला आवडायचे. शाळेने काही सामग्री प्रयोगासाठी घरी देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा असायची. परंतु मुख्याध्यापक कडक शिस्तीचे होते त्यांनी कोणतीही सामुग्री घरी देण्यास विद्यार्थ्यांना नकार दिला. एकदा एका विद्यार्थ्यांने प्रयोगशाळेतील रसायनाची बाटली चोरली. प्रयोगशाळेत शोधाशोध झाली पण ती बाटली काही सापडली नाही. एक महिन्याने तो विद्यार्थी मुख्याध्यापकांकडे गेला आणि त्यांच्यासमोर टेबलावर ती चोरलेली बाटली ठेवली. मुख्याध्यापकांनी सूचक नजरेने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्या मुलाने आपण केलेल्या चोरीची माहिती दिली. प्राचार्यांनी त्याला विचारले,'' जर तुला याची गरज होती तर प्रयोग का केला नाही'' विद्यार्थ्यांने सांगितले,''मी जेव्हाही याचा वापर करण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा माझा थरकाप उडायचा. मला असे वाटत होते की आपण चोरी करण्याचे वाईट काम केले आहे. त्यामुळे बाटली उघडत होतो व पुन्हा ठेवून देत होतो. शेवटी माझ्या आत्म्याने मला ही वस्तू परत ठेवण्यास सांगितले म्हणून ही बाटली मी तुम्हाला देत आहे.'' यावर मुख्याध्यापक म्हणाले,''तू जशी कपाटात ती बाटली जशीच्या तशी ठेवू शकला असतास मग माझ्याकडेच कशाला आणून दिली.'' विद्यार्थी तात्काळ म्हणाला,''सर जशी बाटली घरी नेली ती एक चोरी होती तशीच ती गुपचुपपणे ठेवून दिली असती तर ती दुसरी चोरी ठरली असती माझी'' त्याच्या उत्तराने मुख्याध्यापक खूपच खुश झाले.त्यांनी त्याला वर्गात बसण्यास सांगितले पण विद्यार्थ्याने सरांना शिक्षा सुनावण्यास सांगितले. मुख्याध्यापक म्हणाले,''अरे बेटा, तू महिनाभर केलेल्या चोरीमुळे पश्चात्तापाच्या आगीत जळत होतास हीच तुझी शिक्षा होती. पश्चात्ताप हा मोठा मार्गदर्शक बनून तुला मार्ग दाखवित होता. त्यामुळे तुला वेगळी शिक्षा देणे उचित नाही. तु वर्गात जा, अभ्यास कर आणि चांगला माणूस बन'' विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या पाया पडून वर्गात गेला.
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment